एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत
By Admin | Published: November 4, 2016 01:51 AM2016-11-04T01:51:27+5:302016-11-04T01:51:27+5:30
प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले, त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पाहावयास मिळत आहे.
टीम लोकमत,
मुंबई- प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले, त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पाहावयास मिळत आहे. त्यात मेट्रोमुळे पश्चिम उपनगरला जोडल्या गेलेल्या या परिसरात विकासाचा मुद्दा उमेदवारांच्या अजेंडावर असणार आहे. यावरच भाजपाचे उमेदवार अन्य पक्षांना तोंड देत, जोमाने तयारीला लागलेले दिसून येत आहे.
विक्रोळीत ज्या ठिकाणी एस वॉर्डची सीमा संपते, तेथून एन वॉर्ड हा घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. यामध्ये विक्रोळी पार्क साईट, भटवाडीसारखे डोंगराळ परिसर आहेत. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई नगर परिसरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. एन वॉर्डमध्ये गुजराती, तसेच मराठी भाषिक पट्टा आहे. एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र, त्यातून एक प्रभाग कमी होत, ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत, तर उर्वरित प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने उमेदवारांची पायपीट वाढली आहे.
एन वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष हारुन खान यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पत्नी बॅनरवर झळकताना दिसते आहे, तसेच या भागात भाजपाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे यावर पकड बसविण्यासाठी त्यांनी जोमाने तयारी आहे.
>घाटकोपरमध्ये मेट्रो पश्चिम उपनगरांना जोडली गेल्याने या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टर वाढत आहे, तसेच या भागात व्यापारी संकुलही अधिक आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.
मात्र, डोंगराळ परिसरातील पाण्याचा प्रश्न, तसेच एलबीएसच्या चिंचोळ्या भागामुळे होत असलेली कोंडी, असे मूलभूत प्रश्नदेखील सोडविण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. त्यामुळे मूलभूत प्रश्न सोडविताना नाकीनऊ आलेले उमेदवार कशा पद्धतीने मतदारांची मते जिंकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
>एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र, त्यातून एक प्रभाग कमी होत ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत, तर उर्वरित प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने, या ठिकाणी उमेदवारांची पायपीट वाढलेली दिसून येते.
>२०१२ तील विजयी आणि पराभूत उमेदवार
वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते
११७डॉ. भारती सुबोध भावदाने (सेना) ११३७७ दामिनी दत्तात्रय बसणकर (मनसे) ६४१६
११८हारुन युसूफ खान (राष्ट्रवादी) ९५६७ गणेश अर्जुन चुक्कल (मनसे) ४५०३
११९संजय भालेराव (मनसे) १०७६६सरस्वती गजानन भोसले (शिवसेना) ६६३०
१२०प्रतीक्षा राजू घुगे(राष्ट्रवादी)७८२० निर्मला सुभाष पवार (शिवसेना) ७०२५
१२१रितू राजेश तावडे (भाजपा)७०६९भारती बाबूराव मोरे( मनसे) ५८०६
१२२ दीपकबाबा हांडे (अपक्ष) ८५५९ कोमल शिर्के साई नगरकर (सेना)६५३८
१२३अश्विनी भरत मते (शिवसेना) ९०५०मोहम्मद सलीम मणियार (समाजवादी) ६९८०
१२४प्रवीण छेडा (काँग्रेस)- ८५५७भालचंद्र शिरसाट (भाजपा) - ७७४८
१२५राखी जाधव (राष्ट्रवादी) -८६३९प्रीती जाधव (शिवसेना)- ६९६४
१२६सुरेश आवळे (मनसे) - ४९०९राजेंद्र कांबळे (काँग्रेस) - ३०९५
१२७फाल्गुनी दवे (भाजपा) - १२६३६हर्षा मेहता(काँग्रेस) - ५६९८
१२८मंगल कदम(मनसे) - ७६७० शीला उबाळे ( राष्ट्रवादी)- ४१०६
> प्रभाग क्रमांक - १२३
आरक्षण - खुला (महिला)
एकूण लोकसंख्या- ५३,५३३
अनुसूचित जाती - ६,३३९
अनुसूचित जमाती -५९८
व्याप्ती - हनुमाननगर, विक्रोळी पार्क साइट
> प्रभाग क्रमांक - १२४
आरक्षण- खुला (महिला)
एकूण लोकसंख्या - ५६२०८
अनुसूचित जाती - ४७४३
अनुसूचित जमाती - ८९३
व्याप्ती - वर्षानगर, पार्क साइट कॉलनी, फिरोजशहा गोदरेज कंपनी, सिटी मॉल
> प्रभाग क्रमांक - १२५
आरक्षण- खुला (महिला)
एकूण लोकसंख्या - ५७९१५
अनुसूचित जाती - ७७३५
अनुसूचित जमाती - ९८७
व्याप्ती - रमाबाई कॉलनी, गोदरेज कंपनी, संभाजी पार्क, गोदरेज कॉलनी, व्रिकोळी व्हिलेज
> प्रभाग क्रमांक - १२६
आरक्षण-इतर मागासवर्ग (महिला)
एकूण लोकसंख्या - ५७,९९०
अनुसूचित जाती - ३,२८१
अनुसूचित जमाती - ६५३
व्याप्ती- जगडुशानगर, इंदिरानगर, साईनाथनगर, नित्यानंदनगर, दामोदर पार्क, नाबार्ड कॉलनी
> प्रभाग क्रमांक - १२७
आरक्षण- खुला
एकूण लोकसंख्या - ५२,५२१
अनुसूचित जाती - ३,७९७
अनुसूचित जमाती - ७३९
व्याप्ती - रामनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर, काजरोळकर सोसायटी
> प्रभाग क्रमांक- १२८
आरक्षण- खुला (महिला)
एकूण लोकसंख्या- ५३८६६
अनुसूचित जाती - २३८८
अनुसूचित जमाती -५३२
व्याप्ती - बर्वेनगर, काजुपाडा, गांधीनगर, न्यू दयासागर, मानेकलाल इस्टेट
> प्रभाग क्रमांक - १२९
आरक्षण- इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ५५६४०
अनुसूचित जाती - २४५४
अनुसूचित जमाती - २८६
व्याप्ती - चिराग नगर, आझादनगर, मानेकलाल इस्टेट
(‘एन’ व ‘एस’ विभगाची सामाईक सीमा व विक्रोळी पार्क साइट
> प्रभाग क्रमांक - १३०
आरक्षण- खुला (महिला)
एकूण लोकसंख्या - ५३,९४७
अनुसूचित जाती - ३४९६
अनुसूचित जमाती - ४४२
व्याप्ती - किरोल व्हिलेज, टी.पी.एस. कॉलनी, नेव्हल स्टोअर्स, कपोल वाडी
> प्रभाग क्रमांक - १३१
आरक्षण- खुला
एकूण लोकसंख्या - ६१,८८२
अनुसूचित जाती - ३,३८६
अनुसूचित जमाती - ७०३
व्याप्ती - नायडू कॉलनी, म्हाडा कॉलनी, साईबाबानगर, सावित्रीबाई फुलेनगर
> प्रभाग क्रमांक - १३२
आरक्षण- खुला
एकूण लोकसंख्या - ६२९९२
अनुसूचित जाती - ४००३
अनुसूचित जमाती - ५१०
व्याप्ती - सोमय्या कॉलेज, ओ.एन. जी. सी. कॉलनी, गरोडीयानगर, राजावडी रुग्णालय
> प्रभाग क्रमांक - १३३
आरक्षण- खुला
एकूण लोकसंख्या - ५९,९५०
अनुसूचित जाती - ९,९३३
अनुसूचित जमाती - ५१८
व्याप्ती - कामराजनगर,
रमाबाई आंबेडकर नगर