एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत

By Admin | Published: January 31, 2017 03:25 PM2017-01-31T15:25:31+5:302017-01-31T15:25:31+5:30

प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पहावयास मिळते आहे.

N Ward will play in the competition | एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत

एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत

googlenewsNext

टीम लोकमत : प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पहावयास मिळते आहे. त्यात मेट्रोमुळे पश्चिम उपनगरला जोडल्या गेलेल्या या परिसरात विकासकाचा मुद्दा उमेदवारांच्या अजेंडावर असणार आहे. यावरच भाजपचे उमेदवार अन्य पक्षांना तोंड देत जोमाने तयारीला लागलेले दिसून येत आहे.

विक्रोळीत ज्या ठिकाणी एस वॉर्डची सीमा संपते तेथून एन वॉर्ड हा घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. यामध्ये विक्रोळी पार्क साईट, अमृतनगर, भटवाडी सारखे डोंगराळ परिसर आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई नगर परिसरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. एन वॉर्डमध्ये गुजराती तसेच मराठी भाषिक पट्टा आहे. एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र त्यातून एक प्रभाग कमी होत ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर उर्वरीत प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने या ठिकाणी उमेदवारांची पायपीट वाढलेली दिसून येते.

एन वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष हारुन खान यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने सध्या त्यांची पत्नी बॅनरवर झळकताना दिसते आहे. तसेच याभागात भाजपचे दोन आमदार आहे. त्यामुळे यावर भाजपची पक्कड बसविण्यासाठी त्यांनी जोमाने तयारी केलेली दिसून येते. तसेच अन्य पक्षाचे उमेदवारही विविध उपक्रमांतून मतदारांना आपलेसे करताना दिसत आहे.

मुळात घाटकोपरमध्ये मेट्रो पश्चिम उपनगरांना जोडली गेल्याने या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टर वाढत आहे. तसेच या भागात व्यापारी संकुलही अधिक आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. मात्र डोंगराळ परिसरातील पाण्याचा प्रश्न तसेच एलबीएसचा चिंचोळा भागामुळे होत असलेली कोंडी सारख्या मुलभूत प्रश्न देखील सोडविण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. त्यामुळे मुलुभूत प्रश्न सोडविताना नाकीनऊ आलेले उमेदवार कशा पद्धतीने मतदारांची मते जिंकणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

........................................
‘एन’ वॉर्ड
१२३ ते १३३

प्रभाग क्रमांक - १२३
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या
एकूण- ५३,५३३
अनुसूचित जाती - ६,३३९
अनुसूचित जमाती -५९८
व्याप्ती - हनुमाननगर, विक्रोळी पार्क साईट
........................
प्रभाग क्रमांक - १२४
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५६२०८
अनुसूचित जाती - ४७४३
अनुसूचित जमाती - ८९३
व्याप्ती - वर्षानगर, पार्क साईट कॉलनी, फिरोजशहा गोदरेज कंपनी, सिटी मॉल
....................
प्रभाग क्रमांक - १२५
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५७९१५
अनुसूचित जाती - ७७३५
अनुसूचित जमाती - ९८७
व्याप्ती - रमाबाई कॉलनी, गोदरेज कंपनी, संभाजी पार्क, गोदरेज कॉलनी, व्रिकोळी व्हिलेज
.....................
प्रभाग क्रमांक - १२६
आरक्षणइतर मागासवर्ग (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५७९९०
अनुसूचित जाती - ३२८१
अनुसूचित जमाती - ६५३
व्याप्ती -जगडुशानगर, इंदिरानगर, साईनाथनगर, नित्यानंदनगर, दामोदर पार्क, नाबार्ड कॉलनी
......................
प्रभाग क्रमांक - १२७
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ५२५२१
अनुसूचित जाती - ३७९७
अनुसूचित जमाती - ७३९
व्याप्ती - रामनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर, काजरोळकर सोसायटी
......................
प्रभाग क्रमांक- १२८
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या
एकूण- ५३८६६
अनुसूचित जाती -२३८८
अनुसूचित जमाती -५३२
व्याप्ती - बर्वेनगर, काजुपाडा, गांधीनगर, न्यू दयासागर, मानेकलाल इस्टेट
................
प्रभाग क्रमांक - १२९
आरक्षणइतर मागासवर्ग
लोकसंख्या
एकूण- ५५६४०
अनुसूचित जाती - २४५४
अनुसूचित जमाती - २८६
व्याप्ती - चिराग नगर, आझादनगर, मानेकलाल इस्टेट
(‘एन’ व ‘एस’ विभगाची सामईक सीमा व विक्रोळी पार्कसाईट
........................
प्रभाग क्रमांक - १३०
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५३९४७
अनुसूचित जाती - ३४९६
अनुसूचित जमाती - ४४२
व्याप्ती - किरोल व्हिलेज, टी.पी.एस. कॉलनी, नेव्हल स्टोअर्स, कपोल वाडी
....................
प्रभाग क्रमांक - १३१
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ६१८८२
अनुसूचित जाती - ३३८६
अनुसूचित जमाती - ७०३
व्याप्ती - नायडु कॉलनी, म्हाडा कॉलनी, साईबाबानगर, सावित्रीबाई फुलेनगर
.....................
प्रभाग क्रमांक - १३२
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ६२९९२
अनुसूचित जाती - ४००३
अनुसूचित जमाती - ५१०
व्याप्ती - सोमया कॉलजे, ओ.एन. जी. सी. कॉलनी, गरोडीयानगर, राजावडी रुग्णालय
......................
प्रभाग क्रमांक - १३३
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ५९९५०
अनुसूचित जाती -९९३३
अनुसूचित जमाती - ५१८
व्याप्ती - कामराजनगर, रमाबाई आंबेडकर नगर
-----------------------------------------

Web Title: N Ward will play in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.