मविआकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेच्या गैरवापरानंतरही भाजपा नंबर एकचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 06:06 PM2022-01-19T18:06:24+5:302022-01-19T18:08:13+5:30

Maharashtra Nagar Panchayat Election Results 2022: राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी एकत्रित बेरीज केल्या मोठी मुसंडी मारली आहे. तसेच आतापर्यंतच्या निकालांमध्ये सर्वाधिक २५ नगरपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सर्वाधिक ४१६ नगरसेवक भाजपाचे जिंकून आले आहेत.

Nagar Panchayat Election Result 2022: Reaction of Devendra Fadnavis, BJP's number one party, despite MVA's use of money, penalties and abuse of power | मविआकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेच्या गैरवापरानंतरही भाजपा नंबर एकचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मविआकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेच्या गैरवापरानंतरही भाजपा नंबर एकचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Next

मुंबई - राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल  आज जाहीर झाले. यामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी एकत्रित बेरीज केल्या मोठी मुसंडी मारली आहे. (Nagar Panchayat Election Result 2022) तसेच आतापर्यंतच्या निकालांमध्ये सर्वाधिक २५ नगरपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सर्वाधिक ४१६ नगरसेवक भाजपाचे जिंकून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, राज्यात मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेचा गैरवापर होऊनही भाजपाच एक नंबरचा पक्ष होता आणि राहील असा दावा केला आहे. (Maharashtra Local Body Election Results 2022)

देवेंद्र फडणवीस या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील. भाजपाच्या २४  आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.

जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये भाजपाने मिळवलेल्या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे परिश्रमी कार्यकर्ते आहेत. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणाऱ्या सर्व मतदारांचेही मी मन:पूर्वक आभार मानतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अघोरेखित झाले आहे. मा. मोदींचे नेतृत्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेही हे यश आहे., असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान आज लागलेल्या नगरपंचायतींच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील पक्षांचेच वर्चस्व दिसून आले आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला सर्वाधिक २५ नगरपंचायती आणि ३७८ जागा तर भाजपला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला १८ नगरपंचायती आणि २९७ जागा तर शिवसेनेला १२ नगरपंचायती, ३०१ जागा मिळाल्या आहेत. 

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022: Reaction of Devendra Fadnavis, BJP's number one party, despite MVA's use of money, penalties and abuse of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.