मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार

By admin | Published: June 11, 2016 10:20 AM2016-06-11T10:20:16+5:302016-06-11T10:21:59+5:30

भाजपाने पोस्टरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता शिवसेनेने पोस्टरमधून नरेंद्र मोदींना 'आयत्या बिळात नागोबा' म्हणत भाजपावर पलटवार केला

Nagbo, Modi reinstate Shivsena BJP | मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार

मोदी आयत्या बिळात नागोबा, शिवसेनेचा भाजपावर पलटवार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - केंद्र व राज्यातील सत्तेतील साथीदार भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील कलगीतुरा रंगतच चालला असून भाजपाने पोस्टरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता शिवसेनेने पोस्टरमधून नरेंद्र मोदींना 'आयत्या बिळात नागोबा' म्हणत भाजपावर पलटवार केला आहे. 
शिवसेनेच्या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदींची ‘चुरणबाबा’ आणि ‘आयत्या बिळावरचा नागोबा’ अशा शब्दांत संभावना करण्यात आली आहे. ' आयत्या बिळात नागोबा.. शिवसेनेच्या जोरावर आजवर पसरलात! गद्दार .. आमचे उपकार विसरलात!!' अशा कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. तसेच ' अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही, तसंच विदेशात खूप झालं, जरा देशात बघा, मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? ' असा सवाल विचारणारी पोस्टर्सही व्हायरल झाली असून त्याखाली 'शिवसेना कडकच' असंही लिहीण्यात आलं आहे. 
(भाजपा-शिवसेनेत पुन्हा जुंपले पोस्टरवॉर)
 
 
 
केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. त्यावर ' इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे ' असा प्रतिटोला भाजपाने शिवसेनेला हाणला. तसेच विविध पोस्टर्सच्या माध्यमातून भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. त्याखाली 'i support NaMo!’ असेही लिहीण्यात आले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांची तुलनाही दिग्विजय सिंग यांच्याशी केली होती. यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी पोस्टरच्या माध्यमातून थेट मोदींवर हल्ला चढवला. 
(सेनेचा पोस्टर‘वार’!)
 
(मेहतांच्या टोल्यावर शिवसेनेचा पलटवार, भाजपा-सेनेमध्ये पुन्हा 'पोस्टरवॉर')
  •  
 
  •  
 

 

Web Title: Nagbo, Modi reinstate Shivsena BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.