नागपूर @5.3
By admin | Published: January 11, 2015 12:55 AM2015-01-11T00:55:13+5:302015-01-11T00:55:13+5:30
गत दहा वर्षात शनिवारी नागपुरात सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली. आज किमान तापमान ५.३ अंश से.पर्यंत खाली घसरले. पुढील २४ तासात स्थिती बदलण्याची शक्यता नाही.
दहा वर्षांतील सर्वात थंड दिवस
नागपूर : गत दहा वर्षात शनिवारी नागपुरात सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली. आज किमान तापमान ५.३ अंश से.पर्यंत खाली घसरले. पुढील २४ तासात स्थिती बदलण्याची शक्यता नाही. उत्तर भारतात आलेल्या शीत लहरीमुळे नागपूरसह संपूर्ण मध्य भारतात थंडीची लाट आलेली आहे.
गत पाच दिवसांपासून तापमानात चढउतार सुरू आहे. ६ जानेवारीला तापमान ६.३ अंश से. होते. ७ जानेवारीला ६.९ अंश से., ८ जानेवारीला ८.७ अंश से. ९ जानेवारीला ६.२ अंश से.ची नोंद करण्यात आली. शनिवारी तापमानात आणखी घट झाली.
गत वर्षी ९ जानेवारी २०१३ ला किमान तापमान ५.६ अंश. से. होते. याही पेक्षा कमी तापमानाची नोंद १० जानेवारी २०१४ ला झाली. दोन वर्षापूर्वीचा थंडीचा विक्रम यामुळे मोडला आहे. मात्र गत दहा वर्षातील आजचा दिवस सर्वात थंड म्हणून नोंदविण्यात आला. आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद ७ जानेवारी १९३७ ला ३.७ अंश. से.करण्यात आली होती.
(प्रतिनिधी)