नागपूर : अणेंच्या 'विदर्भ माझा'ला नगरपरिषदेत यश
By admin | Published: January 9, 2017 09:39 AM2017-01-09T09:39:52+5:302017-01-09T12:17:06+5:30
महाराष्ट्रातील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये विदर्भ माझा पक्षाने दणक्यात सुरूवात केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदियामधील २ नगरपरिषद निवडणुकीतील मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे. श्रीहरी अणेंच्या विदर्भ माझा पक्षाने चांगली सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये विदर्भ माझा पक्षाने काटोलमध्ये 4 जागांवर विजय मिळवला असून तर 3 जागांवर आघाडीवर चालत आहे. नगराध्यक्षपदासाठीही विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर आघाडीवर आहेत.
रामटेक नगरपालिकेत भाजपाने शिवसेनेला धक्का देत सत्ता मिळवली आहे. १७ जागांपैकी १३ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस यांना प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले. रामटेकचे नगराध्यक्षपदी भाजपाचे दिलीप देशमुख विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा, कामठी, रामटेक आणि उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी रविवारी मतदान पार पडले. एकूण ३३१ विविध मतदान केंद्रांवर सरासरी ७३.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान काटोल वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.