नागपूरात भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ,
By admin | Published: July 10, 2016 07:24 PM2016-07-10T19:24:01+5:302016-07-10T19:24:01+5:30
विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले
ऑनलाइ लोकमत
नागपूर, दि. १० : विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही आघाडी व युती होण्याची शक्यता कमीच आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्यापेक्षा आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन बळ देण्याचा काँग्रेस व भाजपचा विचार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे युती किंवा आघाडी करून काहीच फायदा होणार नाही, असे या दोन्ही पक्षातील नेत्यांचे मत आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना युती करून लढली. जागा वाटपाच्या वेळी भाजपला काही महत्त्वाच्या जागा शिवसेनेच्या हट्टासाठी सोडाव्या लागल्या. तर काँग्रेसलाही राष्ट्रवादीसाठी एक पाऊल मागे घ्यावे लागले. स्वत:कडे पर्यायी तगडे उमेदवार असलेल्या तसेच जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यामुळे काँग्रेस व भाजपला नुकसान सहन करावे लागले. काही जागा अशा होत्या की त्या ठिकाणी काँग्रेस, भाजपा लढली असती तर विजय नोंदविला असता. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी सोडण्यात आल्यामुळे गमवाव्या लागल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहा व शिवसेनेलाही सहाच जागा जिंकता आल्या. मात्र, आता या सहा जागांसाठी २५ ते ३५ जागांसाठी तडजोड करण्यास काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे नेते तयार दिसत नाहीत.
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत सहज विजय मिळविता येईल, अशी शिवसेना व राष्ट्रवादीची शहरात स्थिती नाही. दोन्ही पक्षाचे काही नगरसेवक व काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावरही विजयी होण्याची क्षमता आहे. मात्र, सर्वच प्रभागात असे चित्र नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते आघाडी व युतीसाठी इच्छुक असल्याचे जाणवते. नुकत्याच झालेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी उघडपणे ह्यएकला चलोरेह्णचा नारा दिला. आपल्याच पक्षात सक्षम कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आता इतरांशी हातमिळवणी कशासाठी करायची, नागपुरात शेवटच्या घटका मोजत असलेल्या शिवसेनेशी युती करून ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर शिवसेनेकडून कुठलेही उत्तर देण्यातआले नाही. शिवनसेना नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे भाजपचे मनोबल आणखी उंचावले आहे.