नागपूर, गोंदियात भाजपाला यश

By admin | Published: January 10, 2017 04:24 AM2017-01-10T04:24:36+5:302017-01-10T04:24:36+5:30

चौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे.

Nagpur, BJP success in Gondiya | नागपूर, गोंदियात भाजपाला यश

नागपूर, गोंदियात भाजपाला यश

Next

नागपूर : चौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस आणि इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
नागपूर जिल्हात भाजपा आमदारांचे प्रस्थ पाहता ९ पैकी ७ ते ८ जागी भाजपचे नगराध्यक्ष विजयी होतील, अशी अपेक्षा असताना ५ ठिकाणीच भाजपला यश आले. कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तर काटोल, नरखेडमध्ये भाजपचे आ.आशिष देशमुख यांना जबर धक्का बसला. रामटेकमध्ये शिवसेनेचा ‘आवाज’ काढण्यात भाजपला यश आले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांचा निसटता विजय झाला. तर गोंदियात माजी नगराध्यक्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक इंगळे विजयी झाले.
सावनेर, खापा, कळमेश्वरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांचा फुगा फुटला. कामठी व मोहप्याने काँग्रेसची लाज राखली. सेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रामटेकच्या गडावरून शिवसेनेचा कडेलोट झाला. तर काँग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील सावनेर, खापा, कळमेश्वर या तिन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली. मोहपा येथे राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्यामुळे काँग्रेसची लाज राखली गेली. सावनेरमध्ये रेखा मोवाडे, खापामध्ये प्रियंका मोहटे व कळमेश्वरमध्ये स्मृती इखार यांनी कमळ फुलविले.
उमरेड येथे माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे गेल्या दहा वर्षांपासून असलेली सत्ता टिकवू शकले नाहीत. येथे भाजपने २५ पैकी १९ जागा जिंकल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Nagpur, BJP success in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.