नागपुरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद; गडकरी म्हणाले, "हे शक्य..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 10:41 PM2022-12-06T22:41:57+5:302022-12-06T22:42:22+5:30

नागपूरचे नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट झाले आहे.

Nagpur bridge and metro works recorded in Guinness book minister nitin Gadkari praises all workers associated with it | नागपुरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद; गडकरी म्हणाले, "हे शक्य..."

नागपुरातील पूल आणि मेट्रोच्या कामाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद; गडकरी म्हणाले, "हे शक्य..."

Next

उपराजधानी आणि ऑरेंज सिटी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराचे नाव आता 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यात आले आहे. वास्तविक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि महा मेट्रोद्वारे नागपूरमध्ये उभारण्यात आलेला हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रोल रेलसोबत सिंगल कॉलमवर समर्थित सर्वात मोठ्या डेबल डेकर व्हायाडक्टला (3.14 किमी) गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये समाविष्ट केले आहे.

या यशाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NHAI आणि महा मेट्रोच्या टीमचे अभिनंदन केले आहे. हे शक्य करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे मी मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठीच असा विकास केला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

काय आहे विशेष?
विशेष म्हणजे, वर्धा रोडवर बांधलेल्या या 3.14 किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गावर छत्रपती नगर, जयप्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर ही तीन मेट्रो स्टेशन्स आहेत. या स्थानकांची अभियांत्रिकी विचार प्रक्रिया, संकल्पना, रचना आणि अंमलबजावणी हे आव्हानापेक्षा कमी नव्हते. जेव्हा प्रकल्पाच्या सुरुवातीला कल्पना करण्यात आली होती, तेव्हा हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वेचे संरेखन वर्धा रोडवरील एकाच हायवेवर होते. यामध्ये मध्यभागी प्रस्तावित पर्यायी ठिकाणी स्वतंत्र पियर होते. नंतर त्याचा आढावा घेण्यात आला आणि डबल डेकर व्हायाडक्ट तयार करण्यासाठी महामार्ग फ्लायओव्हर आणि मेट्रोला एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Nagpur bridge and metro works recorded in Guinness book minister nitin Gadkari praises all workers associated with it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.