नागपूरमध्ये मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!
By admin | Published: August 10, 2014 01:54 AM2014-08-10T01:54:33+5:302014-08-10T01:54:33+5:30
विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ऑगस्टला भूमिपूजन होत आहे.
Next
>नागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ऑगस्टला भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच 25 लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार आहे.
नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गाना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गाची एकूण लांबी 38.2 किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार 1क्526 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसीव्ही) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईर्पयत नागपूर सुधार प्रन्यास (नासुप) या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहत
आहे. (प्रतिनिधी)
केंद्राकडून अद्याप पत्र नाही
मेट्रोरेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातून शहर विकासाला चालना मिळणार आहे. सरकारने यापूर्वी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मंजुरी संदर्भात नासुप्रला पत्र मिळाले नसल्याची माहिती नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची अद्याप सूचना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.