नागपुरात नव्या आरएसएसची स्थापना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 10:33 PM2017-08-30T22:33:52+5:302017-08-30T22:33:57+5:30

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख देशासोबतच जगभरात झाली आहे. अगदी ब्रिटन, अमेरिकेतदेखील संघाच्या शाखा लागत आहेत.

Nagpur is the establishment of a new RSS? | नागपुरात नव्या आरएसएसची स्थापना ?

नागपुरात नव्या आरएसएसची स्थापना ?

googlenewsNext

नागपूर : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख देशासोबतच जगभरात झाली आहे. अगदी ब्रिटन, अमेरिकेतदेखील संघाच्या शाखा लागत आहेत. देशाला दोन पंतप्रधान व अनेक राज्यांना मुख्यमंत्री देणा-या संघाचे नाव व नोंदणीवरून फारसा वाद झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र आता संघाच्या नोंदणीबाबत संघभूमीतूनच आव्हान उभे केले जात असून १९२५ नंतर आता थेट २०१७ मध्ये नागपुरातच नवीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना होण्याची चिन्हे आहेत. वाचून आश्चर्य वाटले असेल. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन धर्मादाय आयुक्तांकडे त्यांच्या संस्थेची नोंदणी आरएसएस या नावाने व्हावी, यासाठी चक्क अर्जदेखील केला आहे. आता खरोखरच नागपुरातून या नव्या संघाला नोंदणी मिळते का आणि असे झाले तर प्रशासकीय दरबारी ह्यआरएसएसह्णची खरी ओळख कोणती, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संस्थेची सरकार दरबारी नोंद आहे का, याबाबत जनार्दन मून आणि काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला विचारणा केली होती. हे प्रकरण धर्मादाय सहआयुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कोणतीही संस्था नोंदणीकृत नसल्यामुळे कोणतीही कार्यवाही करता येत नाही, असे उत्तर धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आले होते, असा दावा मून यांनी केला. यानंतर या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सह धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात स्वत:च्या संस्थेची नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने व्हावी, यासाठी अर्ज केला आहे. आमच्या या संस्थेला ८ सप्टेंबर रोजी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असून या नावाने नोंदणी होणारी ही देशातील एकमेव संस्था ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सामाजिक कार्य करत असताना संस्था नोंदणीकृत असलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी अर्ज केला आहे, असे मून यांनी सांगितले.

नोंदणी नाही, राष्ट्रीय अध्यक्ष कसे झाले ?
यासंदर्भात बुधवारी पत्रकार भवनात जनार्दन मून यांनी पत्रपरिषद घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे अद्याप या संस्थेची नोंदणी झालेली नाही, हे त्यांनीच पत्रपरिषदेमध्ये स्पष्ट केले. मात्र त्यांनी दिलेल्या पत्रकात स्वत:चा उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा केला असून त्यावर स्वत:ची स्वाक्षरीदेखील केली आहे. संस्थेत सर्व सदस्य नागपुरातील आहेत. अशा स्थितीत संस्था राष्ट्रपातळीवरील कशी झाली व नोंदणीविनाच ते राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा ह्यजर-तरह्णचा खेळ
यासंदर्भात संघाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सध्या हा ह्यजर-तरह्णचा खेळ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सर्वदूर माहीत आहे. कुणीही उठावे आणि संघ स्थापन करावा, हे इतके सोपे नाही. संघाची ओळख नाव नाही, तर कार्य, विचार आणि संस्कार आहेत, असे मत एका संघ पदाधिकाºयाने गोपनीयतेच्या अटीवर व्यक्त केले.


 

Web Title: Nagpur is the establishment of a new RSS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.