सोन्याची खाण सापडली, कुही, भिवापुरात माैल्यवान धातू साठे; भारतातच नाही, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:25 AM2022-12-05T06:25:20+5:302022-12-05T06:25:56+5:30

जिल्ह्यात परसाेडीसह किटाळी, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे साेन्याचा खजिना असल्याचे जीएसआयच्या सर्वेक्षणातून समाेर आले हाेते.

Nagpur Gold mine discovered, Kuhi, precious metal deposits at Bhiwapur; Not only in India, but... | सोन्याची खाण सापडली, कुही, भिवापुरात माैल्यवान धातू साठे; भारतातच नाही, तर...

सोन्याची खाण सापडली, कुही, भिवापुरात माैल्यवान धातू साठे; भारतातच नाही, तर...

googlenewsNext

नागपूर : चंद्रपूरला साेन्याच्या खाणी असल्याची चर्चा आहे, पण नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात साेन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम ब्लाॅकमध्ये परसाेडीच्या परिसरात साेन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.

‘लाेकमत’ने यापूर्वीही जीएसआयचा हा अहवाल प्रकाशित केला आहे. जिल्ह्यात परसाेडीसह किटाळी, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे साेन्याचा खजिना असल्याचे जीएसआयच्या सर्वेक्षणातून समाेर आले हाेते. जीएसआयने परसाेडी भागात तपशीलवार सर्वेक्षण करून चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात माैल्यवान धातूचे साठे असल्याची शक्यता वर्तविली आहे. भिवापूर परिसरातही साेन्याचे साठे असण्याची शक्यता आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. या भागात खाेदकाम करण्याचा सल्ला जीएसआयने राज्य सरकारकडे अहवालाद्वारे दिला हाेता. मात्र, कालपरत्वे या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

विशेष म्हणजे, जीएसआयने नागपूर विभागात इतर माैल्यवान धातूंचे साठे असल्याचे अहवालात नमूद केले हाेते. यापैकी परसाेडीच्याच परिसरात तांब्याचेही साठे आहेत. यासह कुही, खाेबना परिसरात माेठ्या प्रमाणात टंगस्टनचे साठे असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातच रानबाेरी, भावनेरी भागात झिंक धातूचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकाेली बेल्टमध्ये निकेल, काेबाल्ट, क्राेमाइट, प्लॅटिनम या गटातील धातूंचे मुबलक साठे आहेत. भारतच नाही, तर आशिया खंडात अशा प्रकारच्या धातूचे साठे असल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. देशात बस्तर खाेरे हे माैल्यवान धातूंसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाचा गडचिराेली, भंडारा व नागपूरचाही प्रदेश या खाेऱ्यात येताे. त्यामुळे जीएसआयने सर्वेक्षण केलेल्या साइटवर पुन्हा सर्वेक्षण करून, खाेदकाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

काेणत्या साइटवर काय?
भिवापूरच्या परसाेडी, किटाळी, मरुपार ब्लाॅकमध्ये साेन्याचे साठे.
परसाेडी भागातच तांब्याच्या खाणी.
कुही, खाेबना या भागात टंगस्टनचे साठे.
रानबाेरी, भावनेरी भागात झिंकच्या खाणी.

Web Title: Nagpur Gold mine discovered, Kuhi, precious metal deposits at Bhiwapur; Not only in India, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं