शिवसेनेच्या निशाण्यावर नागपूर महापालिका!
By admin | Published: January 30, 2017 12:14 AM2017-01-30T00:14:29+5:302017-01-30T00:14:29+5:30
मुंबई महापालिकेतील कारभारावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे
मुंबई : मुंबई महापालिकेतील कारभारावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाच्या ताब्यातील नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची तयारी शिवसेनेने चालविली आहे. त्यामुळे युतीतील वादाचा दुसरा अंक नागपुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना नागपुरात कामे दिली जात आहेत. अनेक कंत्राटदारांची पाळेमुळे भाजपात रुजल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेत मोठे घोटाळे झाले आहेत. नागपुरातील घोटाळ्यांचा पर्दाफास करण्यासाठी शिवसेनेने एक पुस्तिकाही छापली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणारी ही पुस्तिका सोमवारी प्रकाशित केली जाणार आहे.
(प्रतिनिधी)