नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून के. व्यकंटेशम यांची नियुक्ती
By Admin | Published: August 22, 2016 04:38 PM2016-08-22T16:38:08+5:302016-08-22T16:38:08+5:30
अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ - अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदावर बदली करण्यात आली आहे.
राज्यातील सहा वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रायलयाने आज जारी केले. त्यात व्यंकटेशम आणि यादव यांचाही समावेश आहे. मुळचे आंध्रप्रदेशातील असलेले व्यंकटेशम १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ही महत्वपूर्ण जबाबदारी होती. स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे.
त्यांनी राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांमध्ये आमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या असून, अधिकारी, कर्मचा-यांना तणावमुक्त काम करता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
अन्य चार अधिका-यांमध्ये रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून, एस. जगन्नाथन यांची व्यंकटेशम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर, केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची बदली ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) या पदावर तर, मकरंद रानडे यांचे ठाणे आयुक्तालयातच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेली आहे.