नागपूरमध्ये भर चौकातून दागिने पळविले

By Admin | Published: June 21, 2016 04:58 PM2016-06-21T16:58:52+5:302016-06-21T17:10:26+5:30

पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे दागिने लुटारूंनी हिसकावून नेले. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वर्दळीच्या जरीपटक्यात ही खळबळजनक घटना घडली.

In Nagpur, there was a roundabout ornaments in Nagpur | नागपूरमध्ये भर चौकातून दागिने पळविले

नागपूरमध्ये भर चौकातून दागिने पळविले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 -  पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे दागिने लुटारूंनी हिसकावून नेले. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वर्दळीच्या जरीपटक्यात ही खळबळजनक घटना घडली.
माया जागेश्वर बोरकर (वय ५०) या लॉर्ड बुद्धा चौकातून पायी जात होत्या. त्यांच्या मागून आलेल्या पल्सरवरील दोन पैकी एका भामट्याने बोरकर यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ आणि मंगळसूत्र असे चार तोळ्यांचे दागिने हिसकावून पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बोरकर यांना बराच वेळ काही सूचेनासे झाले. नंतर त्यांनी आरडाओरड केली. चौकात यावेळी मोठी गर्दी होती. बोरकर यांनी झालेला प्रकार ईतरांना सांगेपर्यंत लुटारू नजरेआड झाले होते. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी जबरी चोरीची माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. वरिष्ठांना माहिती कळताच त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट दिला. गुन्हेशाखेसह ठिकठिकाणचे पोलीस पथक संशयीत पल्सरचालकांचा शोध घेऊ लागले. बोरकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: In Nagpur, there was a roundabout ornaments in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.