नागपूरचे दोन नक्षलवादी अमरावती कारागृहात
By admin | Published: March 23, 2017 02:28 AM2017-03-23T02:28:40+5:302017-03-23T02:28:40+5:30
नागपूर मध्यवर्ती कारागृहात संघटित गुन्हेगारी, ‘जेलब्रेक’चे प्रकरण व नक्षलवाद्यांची वाढती संख्या पाहता राज्याच्या गृहविभागाने नक्षलवादी कैद्यांना
अमरावती : नागपूर मध्यवर्ती कारागृहात संघटित गुन्हेगारी, ‘जेलब्रेक’चे प्रकरण व नक्षलवाद्यांची वाढती संख्या पाहता राज्याच्या गृहविभागाने नक्षलवादी कैद्यांना अन्य कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येथील दोन नक्षलवादी अमरावती मध्यवती कारागृहात मंगळवारी दाखल झाले आहेत.
नक्षल चळवळीशी संबंध असलेला साईबाबा नागपूर कारागृहात आहे. तसेच त्याच्यासोबत येथे एम. मित्रा व प्रशांत राही हे देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कारागृहातून नक्षली कारवायांना बळ मिळेल, या निर्णयाप्रत गृहविभाग पोहोचला आहे. आधीच या कारागृहात सुमारे ५०० ते ६०० नक्षलवादी व नक्षलसमर्थक कैेद्यांचा भरणा असल्याने येथील नक्षलवाद्यांची संख्या कमी करून त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव अन्य कारागृहात हलविण्याचा निर्णय कारागृह विभागाच्या अतिरिक्त महानिरीक्षकांनी घेतल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)