नागपूर विद्यापीठ : पीएचडी नोंदणीसाठी दुहेरी आव्हान
By admin | Published: July 26, 2016 08:14 PM2016-07-26T20:14:38+5:302016-07-26T20:14:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १ आॅगस्टपासून ह्यपेटह्णसाठी नोंदणी सुरू होणार असून १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत पेटची पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. यंदापासून पेटच्या विषयनिहाय परीक्षा होणार असून उमेदवारांना दुहेरी आव्हानांचा सामना करायचा आहे हे विशेष.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठानेही 'पेट'च्या नियमावलीत काही बदल केले आहेत. 'पेट' यंदा आॅनलाईन आणि लेखी अशा दोन स्तरावर होणार आहे. त्यानुसार दोन पेपर होतील. यात पहिला पेपर हा १०० गुणांचा असून 'अॅप्टिट्यूट टेस्ट' पद्धतीचा असेल. तर दुसरा पेपर हा विषयनिहाय आणि लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेमध्ये स्वतंत्ररीत्या ५० टक्के घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुसूचित जाती, जमातीसाठी ही मर्यादा ४५ गुणांची राहणार आहे. 'पेट' उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी नोंदणी करण्यासाठी तीन वर्षांची मर्यादा दिली आहे. या तीन वर्षांत नोंदणी न केल्यास त्याला पुन्हा 'पेट' द्यावी लागणार आहे.
पेट-२अंतर्गत ६४ विषयांची परीक्षा
विषयनिहाय यासाठी ६४ विषयांची निवड करण्यात आली असून उमेदवाराला आठ प्रश्न देण्यात येणार आहेत. त्यातील पाच प्रश्न सोडवणे अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी १० गुण राहणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या पेपरमध्ये २५ गुण घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. दोन पेपर द्यावे लागणार असल्याने उमेदवारांच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग व खासगी महाविद्यालयांतील संशोधन केंद्र येथे एकूण ४ हजार ५१४ जागा आहेत. यात सध्या ३ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.