नागपूर - दरोडयाचा तयारीतील आरोपी जेरबंद

By admin | Published: August 30, 2016 03:37 PM2016-08-30T15:37:42+5:302016-08-30T15:37:42+5:30

लष्कारीबाग आरामशिन लाईनजवळच्या नाल्यालगत दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका सशस्त्र टोळीला पाचपावली पोलिसांनी जेरबंद केले

Nagpur - Zarband accused of preparing for dacoity | नागपूर - दरोडयाचा तयारीतील आरोपी जेरबंद

नागपूर - दरोडयाचा तयारीतील आरोपी जेरबंद

Next
>- ऑनलाइन लोकमत
घातक शस्त्रे जप्त : पाचपावली पोलिसांची कामगिरी 
नागपूर, दि. 30 - लष्कारीबाग आरामशिन लाईनजवळच्या नाल्यालगत दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका सशस्त्र टोळीला पाचपावली पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीतील गुंडांकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. 
 
गुरूदीपसिंग गलजारसिंग गिल (वय २२, रा. सुगतनगर), निखील गोपाल बडोले (वय २५, रा. बेझनबाग), रजत देवेंद्र शर्मा (वय २२, रा. कपीलनगर, नारीरोड) आणि युवराजसिंग हरविंदरसिंग रंधावा (वय १९, रा. बाबादिपसिंग नगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 
 
सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे सर्व आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत नाल्याजवळ लपून बसल्याची माहिती पाचपावलीचे हवलदार संजय वानखेडे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहका-यांसह जाऊन आरोपींना शिताफीने पकडले. त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्रे, दोरी, मिरची पावडर जप्त करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बी.एम. राठोड यांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या गुन्हेगारांनी यापूर्वी काही गुन्हे केले काय, त्याची चौकशी केली जात आहे. 
 

Web Title: Nagpur - Zarband accused of preparing for dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.