नागपूरात नमो बियर बार...

By admin | Published: October 7, 2015 07:49 PM2015-10-07T19:49:53+5:302015-10-07T19:49:53+5:30

पोलिसांच्या अहवालानंतर आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही गोधनी येथे प्रशासनाकडून 'नमो बियर बार'ला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली आहे

Nagpurat Namo beer bar ... | नागपूरात नमो बियर बार...

नागपूरात नमो बियर बार...

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ - पोलिसांच्या अहवालानंतर आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही गोधनी येथे प्रशासनाकडून 'नमो बियर बार'ला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली ही परवानगी लोकशाही विरोधी असल्याचे सांगत स्थानिक महिला गेल्या ५ दिवसापासून आंदोलन करत आहेत. "बियर बार हटाव, गोधणी बचाव"  असा जयघोषच त्यांनी केला आहे. 
नमो…. नमो… असा जप करत भाजप सत्तेत आले. मात्र, आता नमोच्या नावाने बियर आणि दारू ही विकली जाणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण जवळच शाळा आहे, महिला लहान मुलांची तिथे सतस वरदळ असते. 
स्थानिक नागरिकांचा बियर बार विरोधी कल लक्षात घेत स्थानिक आमदार समीर मेघे यांनीही बियर बारला परवानगी देऊ नये असे पत्र शासनाला दिले होते. मात्र, तरीही मंत्रालयातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी 'नमो बियर बार'ला परवाना बहाल केला.
'नमो बियर बार'चा परवाना नागपूरचे व्यावसायिक आनंद सिंग यांनी त्यांच्या पत्नी संगीता सिंगच्या नावावर मिळवला आहे. संगीता सिंग भाजप नेते उकेश चौहान यांच्या भगिनी आहेत.

Web Title: Nagpurat Namo beer bar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.