कुलभूषणसाठी लढतोय नागपूरचा ‘भूषण’
By admin | Published: May 16, 2017 02:23 AM2017-05-16T02:23:24+5:302017-05-16T02:23:24+5:30
नागपूरचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे सध्या नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या बचावाकरिता भारताकडून युक्तिवाद केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे सध्या नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या बचावाकरिता भारताकडून युक्तिवाद केला.
पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवून फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेमुळे व्हिएन्ना कराराचा भंग झाल्याचा दावा करून, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणावर १५ न्यायमूर्तींच्या न्यायपीठापुढे सुनावणी होती. देशाची अस्मिता पणास लागलेल्या या प्रकरणात साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ९ मे रोजी कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती मिळवून पहिली लढाई जिंकली होती.
अरुणा उपाध्याय सध्या लंडनमध्ये आहेत. ‘लोकमत’ने सोमवारी, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा क्षण केवळ आमच्या कुटुंबीयांसाठीच नाही तर, संपूर्ण नागपूरसाठी अभिमानाचा आहे. हरीश यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते कुलभूषण यांना निर्दोष मुक्त करण्यात यशस्वी होतील. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला त्यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, असे अरुणा उपाध्याय यांनी सांगितले.