नागपूरच्या प्रणाली राऊत ‘सखी सम्राज्ञी’
By Admin | Published: January 24, 2017 04:02 AM2017-01-24T04:02:50+5:302017-01-24T04:02:50+5:30
लोकमत सखी मंच व पीपीआरएल ‘मेरा घर’ प्रस्तुत पॉवर्ड बाय दि जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय
जळगाव : लोकमत सखी मंच व पीपीआरएल ‘मेरा घर’ प्रस्तुत पॉवर्ड बाय दि जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सखी सम्राज्ञी महाअंतिम सोहळ््यात नागपूरच्या प्रणाली राऊत यांनी बाजी मारत यंदाच्या ‘सखी सम्राज्ञी’चा किताब पटकविला.
जळगावच्या डॉ. करिष्मा सांखला या द्वितीय तर अहमदनगरच्या शोभा ढेरे या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. अकोला येथील डिंपल वानखेडे या उत्कृष्ट कलाविष्कार तर माधवी धसे सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. महाराष्ट्रातील १२ विजेत्या स्पर्धकांची सखी सम्राज्ञी ही राज्यस्तरीय महाअंतिम फेरी शनिवारी येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात बहारदार सोहळ््याने रंगली.
कर्करोगाशी झुंजणाऱ्या मिसेस वर्ल्ड नमिता कोहोक यांनी सखींशी संवाद साधताना जीवनातील चढ-उतारांविषयी गप्पा मारल्या.
प्रणाली राऊत (नागपूर) यांचा सखी सम्राज्ञीचा मुकुट घालून ११ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गळ्यात सॅश घालून गौरव करण्यात आला.
डॉ. करिष्मा सांखला (व्दितीय, जळगाव) यांना सात हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सॅश तर शोभा ढेरे (तृतीय, अहमदनगर) यांना पाच हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सॅश देण्यात आला. डिंपल वानखेडे (उत्कृष्ट कलाविष्कार, अकोला) व माधवी भसे (सर्वोत्कृष्ट वेशभूषा, मुंबई) यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)