नायब तहसीलदारास दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 10:14 PM2016-07-21T22:14:17+5:302016-07-21T22:14:17+5:30

भूमिअभिलेखक कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करुन घेण्यासाठीचे आदेश काढण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पूर्णा तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या

Nahab Tehsildar was caught taking bribe of Rs.10 thousand | नायब तहसीलदारास दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले

नायब तहसीलदारास दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले

Next

ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 21 -  भूमिअभिलेखक कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करुन घेण्यासाठीचे आदेश काढण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पूर्णा तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात रंगेहाथ पकडले.
पूर्णा येथील तहसील कार्यालयात महसूल विभागात मधुकर विश्वनाथ दलाल हे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. २० जुलै रोजी तक्रारदाराने पूर्णा परिसरातील गट ४५ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करुन घेण्यासाठी आदेशाची मागणी नायब तहसीलदार दलाल यांच्याकडे केली होती. त्यावेळी दलाल यांनी हे आदेश काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीच्या पथकाकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सायंकाळी ५ वाजता दलाल यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी दोन पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक नारायण बेंबडे, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, हवालदार लक्ष्मण मुरकुटे, राजू ननवरे, शिवाजी भोसले, पोलिस नाईक लक्ष्मण उपलेंचवार, सचिन गुरसुडकर, सारिका टेहरे, भालचंद्र बोके, मुंडे यांनी केली. पोलिस उपअधीक्षक बेंबडे तपास करीत आहेत.

Web Title: Nahab Tehsildar was caught taking bribe of Rs.10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.