नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 01:55 PM2018-04-23T13:55:22+5:302018-04-23T13:55:22+5:30

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

Nahar land acquisition permission rejected, Industry Minister Subhash Desai's announcement | नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

Next

रत्नागिरी- नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौ-यावर आहेत. तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करून शिवसेनेनं आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नाणारवासीयांनी व्यक्त केली होती.
 
मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रिपद सोडू, अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणाऱ्या  रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. या परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे नाणार दौ-यावर आले होते. त्याच वेळी नाणारमधल्या जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.  

Web Title: Nahar land acquisition permission rejected, Industry Minister Subhash Desai's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.