नाईक दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत- दिग्विजयसिंह
By admin | Published: July 15, 2016 04:11 PM2016-07-15T16:11:13+5:302016-07-15T16:11:34+5:30
डॉ. झाकीर नाईक कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - डॉ. झाकीर नाईक कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत. इस्लाम शांतीसाठीच असल्याचे बोलत असतात अशा शब्दात काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस खासदार दिग्विजयसिंह यांनी डॉ. नाईक यांचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी संवेदनाहिन असल्याची टिका करीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला काश्मिर प्रश्न समजलाच नाही असे मत व्यक्त केले.
दहशतवादाला उत्तेजन देणारी भाषणे करीत असल्याबद्धल सध्या डॉ. नाईक केंद्र सरकारच्या रडारवर आहेत. त्यांचे दिग्विजयसिंह यांनी समर्थन केले. त्यांचे भाषण आपण ऐकले आहे असे सांगून दिग्जिजयसिंह म्हणाले,ह्यह्य स्वामी असिमानंद यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांना केंद्र सरकार देणगी देते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडतात, ते आसारामबापू तुरूंगात आहेत. साध्वी असलेल्या कोणी प्राची डॉ. नाईक यांचे मुंडके आणून देणाऱ्याला ५० लाखांचे बक्षिस जाहीर करतात. या सगळ्यांवर कारवाई होत नाही व डॉ. नाईक यांची मात्र चौकशी केली जाते. याचे कारण भाजपला हिंदू मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचे आहेत. असे दंगे झाले तर त्यात सर्वाधिक नुकसान काँग्रेसचे होते हे त्यांना माहिती आहे. ह्णह्ण
काश्मिर प्रश्नाबाबत भाजपला काहीच माहिती नाही व माहिती करून घ्यायची त्यांना गरजही वाटत नाही. पंडित नेहरू, त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व डॉ. मनमोहनसिंग यांना हा विषय समजला होता, त्यामुळे त्यांनी चर्चेवर जोर दिला. मोदी यांना तर त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. ज्या बराक ओबामा यांची ते स्तुती करतात ते अमेरिकेत काही घडले तर लगेच स्वदेशात परत येतात, इथे काश्मिर जळत असताना मोदी मात्र टांझानियात विकासाचे ढोल वाजवित होते अशी टिका दिग्विजयसिंह यांनी केली. मोदी संवेदनाहिन असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या राज्यात महात्मा गांधी यांच्या हत्याऱ्याला संत बनविले जात आहे. धार्मिंक दंगे करून सत्ता टिकवायची हाच भाजपचे अजेंडा आहे. या विरुद्ध देशातील सर्व निधर्मीवादी शक्तींनी एकत्र व्हायला हवे असे मत व्यक्त करून दिग्विजयसिंह म्हणाले, ह्यह्यशरद पवार हे करू शकतात, काही जणांबरोबर ते या विषयावर खासगीत बोलत असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांनी जाहीरपणे बोलावे असे माझे आवाहन आहे. त्यांनीच नाही तर काँग्रेसने ज्यांना मोठे केले त्या सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे.
प्रियंका गांधी राजकारणात कधी येणार या प्रश्नावर राहूल गांधी राजकारणात आहेत व प्रियंका नाहीत असे संक्षिप्त उत्तर देत दिग्विजयसिंह यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.