गुलालाच्या उधळणीत नाईकबाच्या नावानं चांगभलं !

By Admin | Published: April 2, 2017 06:56 PM2017-04-02T18:56:53+5:302017-04-02T18:56:53+5:30

‘चांगभलं’चा अखंड गजर आणि गुलाल, खोबºयाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी नाईकबा देवाचा पालखी सोहळा

Naikaba's name is good in the spell of Gulab! | गुलालाच्या उधळणीत नाईकबाच्या नावानं चांगभलं !

गुलालाच्या उधळणीत नाईकबाच्या नावानं चांगभलं !

googlenewsNext
>आॅनलाईन लोकमत
सणबूर (सातारा), दि. 2 - ‘चांगभलं’चा अखंड गजर आणि गुलाल, खोबºयाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रविवारी नाईकबा देवाचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरमाथ्यावर भाविकांचा महासागर पाहावयास मिळाला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली. दोन्ही राज्यांतील भाविक यात्रेसाठी देवस्थानावर हजर झाले आहेत. शनिवारी रात्रीपासून भाविक येण्यास सुरुवात झाली. शनिवारी नैवेद्याचा दिवस होतो. त्यामुळे भाविक सासनकाठ्यांसह देवदर्शनासाठी आले होते. पायरी ते घाटमार्ग यामुळे गजबजून गेला होता. रात्री डोंगरमाथ्यावरच भाविकांनी मुक्काम ठोकला होता. रविवारी पहाटे पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. 
दूरवरून आलेल्या सासनकाठ्याही त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गुलाल अन् खोबºयाची उधळण करत निघालेल्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी झाले होते. ‘चांगभलं’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. पालखी सोहळ्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 
त्यानंतर मेवामिठाई, खेळणी, स्टेशनरी आदींची खरेदी करून भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला. कडक ऊन असल्याने व रात्रीच्या जागरणाने यात्रेकरूंनी कºहाड-ढेबेवाडी रस्त्यावरील मोकळ्या शिवारात विश्रांतीसाठी ठिय्या मांडला होता. दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर हे भाविक पुढे मार्गस्थ झाले. नाईकबाचा डोंगरमाथा व संपूर्ण परिसर गुलालाने रंगून गेला होता. यात्रास्थळी पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी पाण्याची सोय केली होती. सांगली, सातारा, मिरज, इस्लामपूर, कोल्हापूर, शिराळा, इचलकरंजी, कºहाड, पाटण व कर्नाटक राज्यातील एसटी आगारामार्फत मोठ्या प्रमाणात एसटीची सोय करण्यात आली होती. 
यात्रेत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रास्थळी तेरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. दोन वॉच टॉवर उभारण्यात येऊन त्यावर कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल तसेच वीजवितरणचे कर्मचारी यात्रास्थळी थांबून होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, नायब तहसीलदार विजय जाधव, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्यासह पाच पोलिस उपनिरीक्षक साठ कर्मचारी, वीस वाहतूक कर्मचारी, १२७ होमगार्ड, आरसीपी दल तैनात होते. परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक राग सुधा आर यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. 
संशयास्पद वावरणा-या आठजणांवर कारवाई
यात्रेतील हालचालींवर पोलिस अधिकारी व कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यावेळी आठजण यात्रेत संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बीड, नांदेड, लातूर येथील असल्याचे समोर आले. संबंधितांजवळ विभागातील यात्रांच्या तारखांची यादीही पोलिसांना आढळून आली. त्या आठजणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Web Title: Naikaba's name is good in the spell of Gulab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.