‘नाम’ पश्चिम महाराष्ट्रात!
By admin | Published: December 11, 2015 02:27 AM2015-12-11T02:27:24+5:302015-12-11T02:27:24+5:30
विदर्भ अन् मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक बळ देणाऱ्या नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांनी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा : विदर्भ अन् मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक बळ देणाऱ्या नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांनी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. १७ डिसेंबर रोजी ते कोरेगाव तालुक्यातील नलावडेवाडी अन् खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे भेट देऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाण्यासाठी सतत वेगवेगळे यशस्वी प्रयोग करणारे डॉ. अविनाश पोळ गेल्या महिन्यातच नाना पाटेकर यांना भेटले होते. त्या वेळी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरही त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये नाना अन् मकरंद यांच्या सातारा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील नलावडेवाडी येथे पाणी शुद्ध करण्याचे मशिन ‘नाम’ या संस्थेतर्फे देण्याचा निर्णय नाना अन् अनासपुरे यांनी घेतला आहे. तसेच खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील सुमारे ५० शेतकऱ्यांना ५० एकर क्षेत्रासाठी मोफत ठिबक संच देण्याचेही ठरले आहे.