राज्यभरात 'ईद-उल-अजहा' चे नमाज पठण उत्साहात संपन्न

By admin | Published: September 13, 2016 11:26 AM2016-09-13T11:26:04+5:302016-09-13T11:30:16+5:30

त्याग,संयम व विश्वशांतीचा संदेश देणारी ईद-उल-अजहाचे (बकरी ईद) नमाज पठण राज्यभरात करण्यात आले.

Namaz recited 'Eid-ul-Ajha' in the heart of the state | राज्यभरात 'ईद-उल-अजहा' चे नमाज पठण उत्साहात संपन्न

राज्यभरात 'ईद-उल-अजहा' चे नमाज पठण उत्साहात संपन्न

Next

 ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ -  त्याग,संयम व विश्वशांतीचा संदेश देणारी ईद-उल-अजहा (बकरी ईद) चे नमाज पठण कोल्हापूरमध्ये   शहरातील दसरा चौकामध्ये असलेल्या मुस्लिम बोर्डीगच्या मैदानावर  सकाळी झाले. त्यानंतर मानव कल्याण व विश्वशांती देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक दुवा प्रार्थना करण्यात आली.

नाशिकमध्येही झाले पठण

नाशिक शहरातील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदानावर  ईद उल अझ्हा अर्थात बकरी ईदच्या नमाज पठणाचा सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. खतीब ए शहर हिसमुद्दीन अश्रफी यांनी विश्वशांती व भारताच्या सुरक्षेसाठी दुवा मागितली. उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांनी अमीन म्हणत दुवाला प्रतिसाद दिला. 

 

विक्रमगडमध्येही ईद-उल-अझ्हा' उत्साहात साजरी
विक्रमगड शहरातील मदरसा येथे मुस्लिम बांधवांकडून ईद उल अझ्हा अर्थात बकरी ईदचे नमाज पठण झाले. नंतर सर्व मुस्लिम बांधवानी मस्जिदच्या मौलनांसह ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच येथील हिंदू बांधवानी व पोलीस अधिका-यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान पालघर जिल्हयात सरवञ बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे

 

 
जव्हार मध्ये 'ईद-उल-अझ्हा' उत्साहात साजरा
पावसाने उघडीप दिल्याने यंदा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून ईद उल अझ्हा अर्थात बकरी ईदचे नमाज पठण झाले. जव्हार मध्ये हिंदू बांधवानी व पोलीस अधिका-यांनानी ईदच्या शुभेच्छा दिल्या. 
 

Web Title: Namaz recited 'Eid-ul-Ajha' in the heart of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.