नामदेव धोंडो महानोर यांचा आज जन्मदिवस

By Admin | Published: September 16, 2016 11:18 AM2016-09-16T11:18:42+5:302016-09-16T11:19:34+5:30

नामदेव धोंडो महानोर हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

Namdeo Dhondo Mahanor's birthday today | नामदेव धोंडो महानोर यांचा आज जन्मदिवस

नामदेव धोंडो महानोर यांचा आज जन्मदिवस

googlenewsNext
प्रफुल्ल गायकवाड
पुणे, दि. 16 - नामदेव धोंडो महानोर हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
 
जीवन
महानोरांचा जन्म सप्टेंबर १६, इ.स. १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.
 
प्रकाशित साहित्य
(इ.स.)अजिंठा (कवितासंग्रह) पॉप्युलर प्रकाशन
गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोका साकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळ कविता संग्रह साकेत प्रकाशन
पळसखेडची गाणी लोकगीते पॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवे पॉप्युलर प्रकाशन
पानझड पॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
यशवंतराव चव्हाण साकेत प्रकाशन
रानातल्या कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मी साकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवन साकेत प्रकाशन
 
चित्रपट गीते
एक होता विदुषक
जैत रे जैत
निवडुंग
 
राजकीय कारकीर्द
महाराष्ट्र विधान परिषदेवर नियुक्त सभासद म्हणून महाराष्ट्र शासनाने महानोरांची शिफारस केल्यावर इ.स. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.
 
पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 

 

Web Title: Namdeo Dhondo Mahanor's birthday today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.