सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल - पीयूष गोयल
By admin | Published: June 10, 2017 12:35 PM2017-06-10T12:35:07+5:302017-06-10T13:26:14+5:30
आमच्या सरकारने मागच्या तीनवर्षात शेतकरी आणि खेडयांकडे जास्त लक्ष दिले. एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के...
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - आमच्या सरकारने मागच्या तीनवर्षात शेतकरी आणि खेडयांकडे जास्त लक्ष दिले. एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरु केलेली फसल विमा योजना उपयुक्त ठरली असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मध्ये बोलत होते. ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ऊर्जा समिटचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती. आमच्या सरकारने महागाई 12 टक्क्यावरुन 3 टक्क्यांवर आणली.
आणखी वाचा
पीयूष गोयल यांच्या भाषणातील मुद्दे
- गेल्या तीनवर्षात सरकारने जास्त लक्ष दिले असेल तर शेतकरी आणि खेडयांकडे
- गेल्या तीनवर्षात खताची एकदाही कमतरता भासली नाही, खत व्यवहारातील दलाल आम्ही नष्ट केले.
- केवळ बजेटमध्ये घोषणा करणे आमचे उद्दिष्टय नाही, परिणाम काय येतात त्याकडे आम्ही लक्ष देतो.
- पूर्वी बजेट पास व्हायला मे महिना उजाडायचा, खरा खर्च करण्यास वर्षातले शेवटचे काही महिने उरायचे, पण आता बजेटमधला खर्च करण्यास पुरेसा वेळ मिळतो.
- महागाई 12 टक्क्यावरुन सरकारने 3 टक्क्यावर आणली.
- 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती.
- स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली.
- जीएसटीमुळे सेवांचा दर्जा सुधारेल, वस्तूंच्या किंमती कमी होतील, पारदर्शकता वाढेल.
देशात सर्वांनी 100 टक्के LED दिव्यांचा वापर केला तर, देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर 112 अब्ज युनिट वीजही वाचेल असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
कोळसा आता सरप्लस असून, कोळसा आयात बंद करुन आपण स्वत: सक्षम झालो आहोत असे पीयूष गोयल यांनी सांगितले. सर्वांना 24 तास वीज मिळावी यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये लोकमतच्या या समिटमुळे मदत होईल असे सांगताना त्यांनी लोकमतच्या ऊर्जा समिट आयोजनाचे त्यांनी कौतुक केले.
18,500 गावाना 1 हजार दिवसात वीज पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता 600 दिवस झाले असून 3800 गावात वीज जोडणी बाकी आहे. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर, पाणी आणि वीज देण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे गोयल म्हणाले.
"Why do banks keep calling you for inauguration ceremonies?" @vijayjdarda shares a light moment with @PiyushGoyal at #LokmatUrjaSummit. pic.twitter.com/EI561z8Gr5
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) June 10, 2017