‘बालकुमार’च्या नामकरण हालचालींना १५ वर्षांनी वेग

By admin | Published: October 4, 2015 03:01 AM2015-10-04T03:01:54+5:302015-10-04T03:01:54+5:30

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेचे नामकरण करण्याच्या हालचालींना तब्बल १५ वर्षांनी वेग आला असून त्याबाबतच्या घटनादुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे.

The name of 'Balkumar' will be speeded up by 15 years | ‘बालकुमार’च्या नामकरण हालचालींना १५ वर्षांनी वेग

‘बालकुमार’च्या नामकरण हालचालींना १५ वर्षांनी वेग

Next

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेचे नामकरण करण्याच्या हालचालींना तब्बल १५ वर्षांनी वेग आला असून त्याबाबतच्या घटनादुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे. १८ आॅक्टोबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत ही दुरुस्ती मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर हा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तालयाकडे पाठवला जाणार
बालकुमार साहित्य संमेलन आणि बालवाङ्मय पुरस्कार यांचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्यात येणार आहे. नावात बदल करण्यात आल्याचा अहवाल देखील धर्मादाय आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला. मात्र, संस्थेच्या नावात बदल झाला आहे की नाही. हे न पाहताच नव्या कामकाजास सुरूवात करण्यात आली. १५ वर्षे जुन्याच संस्थेच्या नोंदणी क्रमांकावर संस्थेचे कामकाज सुरू होते.
धर्मादाय आयुक्तांनी नवीन नावाला मंजुरी दिली नसल्याची बाब ‘बालकुमार’च्या पदाधिकाऱ्यांनीच उघडकीस आणली होती. त्यानंतर डॉ. वि. वि. घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून घटना समितीत काही बदल करण्यात आले. असून त्याबाबतचा प्रस्ताव आता धर्मादाय आयुक्तालयाकडे पाठवला जाणार असल्याचे विद्यमान कार्यवाह सुनील महाजन यांनी सांगितले.

- अमरेंद्र गाडगीळ यांनी १९७६मध्ये ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या नावाने संस्थेची नोंदणी केली होती. त्यानंतर २४ वर्षांनी विश्वस्तांच्या मान्यतेने ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था’ असे नामकरण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

Web Title: The name of 'Balkumar' will be speeded up by 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.