दारिद्रय़ रेषेखालील यादीत चक्क आमदाराचे नाव!

By Admin | Published: June 29, 2016 12:26 AM2016-06-29T00:26:01+5:302016-06-29T00:26:01+5:30

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठीही ठरविले पात्र: आ.बोंद्रेंनी उडवली अंमलबजावणी यंत्रणेची खिल्ली.

The name of the common man in the list below poverty line! | दारिद्रय़ रेषेखालील यादीत चक्क आमदाराचे नाव!

दारिद्रय़ रेषेखालील यादीत चक्क आमदाराचे नाव!

googlenewsNext

सुधीर चेके पाटील/चिखली (जि. बुलडाणा)
देशातील गोरगरिबांच्या हितासाठी अहोरात्न झटणारे पंतप्रधान व त्यांचे कर्तव्यदक्ष सरकार अशी स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या केंद्र सरकारवर चिखलीमध्ये नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कारभारामुळे आ. राहुल बोंद्रे यांचे नाव चक्क दारिद्रय़ रेषेखालील गरिबांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच यादीचा संदर्भ घेऊन प्रधानमंत्नी उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस जोडणीसाठीचे पात्न लाभार्थी म्हणूनदेखील आमदारांचे नाव गॅस एजन्सीला प्राप्त झाले असल्याने प्रशासनाच्या या बेपर्वाईवर आ. बोंद्रेंनी जोरदार ताशेरे ओढत हा भोंगळ कारभार म्हणजे ह्यमेक इन इंडियाह्ण असल्याचा टोला लगावला आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या इण्डेन गॅस कंपनीकडून स्थानिक वितरकाला प्रधानमंत्नी उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या गोरगरिबांना मोफत गॅस जोडण्या द्यायच्या आहेत, त्यांची यादी नुकतीच प्राप्त झाली, तेव्हा हे बिंग फुटले. या यादीत चक्क आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव पाहून वितरक अचंबित झाले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर यामागील भोंगळ व बेजबाबदार कारभार उघड झाला आहे.

ख-या लाभार्थ्यांना डावलले!
भारतातील महिलांना स्वयंपाक करताना मोठय़ा प्रमाणात धुराचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे एलपीजीचे कनेक्शन देण्यात येणार आहे. दारिद्रय़ रेषेखाली कुटुंबांना याचा लाभ दिल्या जाणार आहे. सरकारची ही योजना गोरगरिबांसाठी लाभदायी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी न होता खर्‍या लाभार्थ्यांना डावलून धनाधांडग्यांनाच त्याचा लाभ दिल्या जात असल्याची बाब यानिमित्ताने उघड झाली आहे.

Web Title: The name of the common man in the list below poverty line!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.