देसाईंच्या नावावरून सुंदोपसुंदी

By admin | Published: November 9, 2014 02:52 AM2014-11-09T02:52:36+5:302014-11-09T02:52:36+5:30

केंद्रातील रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

On the name of Desai, Sundopusundi | देसाईंच्या नावावरून सुंदोपसुंदी

देसाईंच्या नावावरून सुंदोपसुंदी

Next
शिवसेनेत नाराजी : पंतप्रधान मोदींना न भेटताच गिते मुंबईकडे
मुंबई : केंद्रातील रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेचे काही ज्येष्ठ खासदार नाराज झाले आहेत. आम्ही मातीवरची माणसं आहोत़ पक्षाने आम्हाला शेवटी तिथेच ठेवले, अशा शब्दांत एका खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर आपली भावना व्यक्त केली. तर दुसरीकडे राज्यात किमान चार कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री दर्जाची मंत्रिपदे  मिळावीत, असा शिवसेनेचा प्रस्ताव घेऊन केंद्रीय मंत्री अनंत गिते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होत़े मात्र त्यांची भेट न घेताच गिते मुंबईकडे रवाना झाल्याने उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वतीने देसाई मंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबतचा संभ्रम कायम आह़े  
भाजपाने माजी मंत्री सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोटय़ातून समाविष्ट करण्याचा आग्रह धरला होता. मात्र प्रभू हे सध्या शिवसेनेशी थेट संबंधित नसल्याने त्यांना भाजपाने (पान 3 वर)
 
..तोर्पयत मंत्रिपदाची शपथ नाही !
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच लाभला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्यावर विश्वास टाकला आणि आपल्या नावाची शिफारस केंद्रात मंत्रिपदाकरिता केल्याने आपण कृतकृत्य झालो. मात्र जोर्पयत महाराष्ट्राबाबत भाजपा भूमिका जाहीर करणार नाही तोर्पयत शिवसेना मंत्रिपदाची शपथ घेणार नाही.-अनिल देसाई,  खासदार
 
शिवसेनेने धरला आग्रह
महाराष्ट्रात किमान 4 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रिपदे हवी, असा आग्रह शिवसेनेने धरला असून, त्याबाबत निर्णय घेतला तरच देसाई हे रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. अर्थात शिवसेनेचा हा इशारा दबावतंत्रचा भाग असून, प्रत्यक्षात मंत्रिपदाची संख्या व खाती याबाबत भाजपा व शिवसेनेत प्रस्तावाची देवाणघेणाव यापूर्वी झाल्याचे कळते. अर्थात या प्रस्तावाची औपचारिक घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी व्हावी, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.
 
या खात्यांची केली मागणी़़़
च्राज्य सरकारमध्ये तूर्त 10 मंत्री समाविष्ट झाले असले तरी किमान 16 खात्यांचे वाटप अजून झालेले नाही किंवा त्यापैकी दोन-तीन खाती सध्याच्या भाजपा मंत्र्यांकडे अतिरिक्त म्हणून सोपवली आहेत. 
च्ऊर्जा, कृषी, जलसंपदा, आरोग्य व कुटुंबकल्याण, परिवहन, अन्न व नागरी पुरवठा अशा काही प्रमुख खात्यांची कॅबिनेट मंत्रिपदे शिवसेनेला हवी आहेत. 
च्या 16 खात्यांपैकी काही खाती एकमेकांना जोडून आठ कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे निर्माण करता येऊ शकतात. त्यापैकी चार कॅबिनेट मंत्रिपदे शिवसेनेला द्यावी, असा प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे.

 

Web Title: On the name of Desai, Sundopusundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.