सागरी महामार्गाला अंतुले यांचे नाव द्या!
By admin | Published: December 9, 2014 02:28 AM2014-12-09T02:28:47+5:302014-12-09T02:28:47+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा व विधान परिषदेचे माजी सदस्य भास्करराव शिंदे यांना विधिमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Next
विधिमंडळात मागणी : अंतुले, देवरा, शिंदे यांना दोन्ही सभागृहांची श्रद्धांजली
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा व विधान परिषदेचे माजी सदस्य भास्करराव शिंदे यांना विधिमंडळात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत या तिन्ही नेत्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. या तिन्ही नेत्यांनी नेहमी जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून कामे केली व राज्याला नवीन ओळख दिली होती. यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
बॅ.अंतुले यांच्यामुळेच राज्यात राज्यमंत्रिपद निर्माण झाले. शिवाय आमदारांचा मान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले होते असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ‘अंतुले पॅटर्न’ निर्माण झाला होता. ते तत्काळ निर्णय घ्यायचे. दुर्दम्य आत्मविश्वास, तडफदार नेतृत्व हे त्यांचे स्वभावगुण होते. त्यांच्यामुळेच सहकार चळवळीला राज्यात बळ मिळाले अशा भावना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मांडल्या. अंतुले यांच्या तडफदारपणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील प्रभावित झाले होते असे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनीदेखील आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था निर्माण करण्याची सदस्यांची सूचना विचार करण्यासारखी आहे असे मत सभापतींनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या जाण्यामुळे मुत्सद्दी नेता, कुशल राजकारणी आणि सामान्यांचा आवाज हरवल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे म्हणाले. देवरा हे प्रचंड मृदूभाषी होते व पक्षाच्या बाहेरदेखील त्यांचा प्रभाव होता या शब्दांत माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार म्हणून लौकिक असलेले भास्करराव शिंदे यांच्या निधनाने एका उत्कृष्ट नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांचे ‘माय फ्रेंड’ हे शब्द आजही लक्षात आहे असे मत सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार कपील पाटील, हेमंत टकले, भाई जगताप, निरंजन डावखरे, आनंद पाटील, जोगेंद्र कवाडे, मुझफ्फर हुसेन यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
नागपूर : कोकणचे ‘कॅलिफोर्निया’ करण्याचे स्वप्न सर्वात अगोदर माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनीच पाहिले होते. त्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवर तयार होणा:या सागरी महामार्गाला अंतुले यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी विधिमंडळात सदस्यांनी केली.
तटकरेंची नाराजी
शोकप्रस्तावावर आपले मत मांडत असताना सुनील तटकरे यांनी शासकीय शिथिलतेबाबत नाराजी व्यक्त केली. अंतुले यांचे 2 डिसेंबर रोजी सकाळी 1क् च्या सुमारास निधन झाले. परंतु शासकीय दुखवटा जाहीर करण्यासाठी शासनाला पाच तास लागले. असा प्रकार परत घडू नये असे ते म्हणाले.