‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:24 AM2017-11-12T03:24:13+5:302017-11-12T03:24:58+5:30

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे.

The name of 'Lokmat' is written by the reader. New version will soon be in Delhi ... | ‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

Next

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे. ‘लोकमत’ची ही १८वी आवृत्ती असेल व १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीतील अशोका हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये होणा-या कार्यक्रमात तिचा शुभारंभ होईल.
‘लोकमत’ने या प्रदीर्घ वाटचालीत आपली मूल्ये कटाक्षाने जपली असून, ‘पत्रकारिता परमो धर्म:’ या ध्येयाशी अतूट बांधिलकी ठेवली आहे. यामुळेच वाचकांचे ‘लोकमत’वर उदंड प्रेम आहे. गेली कित्येक वर्षे ‘लोकमत’चे निस्सीम वाचक असलेले केवलचंद कपूरचंद सिंघवी हे वाचकांच्या या अलोट प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. केवलचंद सिंघवी यांनी आपल्या हातावर ‘लोकमत’ हे नाव १९८१मध्येच गोंदवून घेतले आहे. सिंघवी आजही त्याच भक्तिभावाने ‘लोकमत’ वाचतात व ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा यांच्याविषयीचे प्रेम नि:संकोचपणे व्यक्त करतात.
आमच्या असंख्य निष्ठावंत वाचकांनी केवलचंद यांच्याप्रमाणे ‘लोकमत’ हे नाव गोंदवून घेतले नसेलही, तरी त्यांचे प्रेम निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारितेशी आमच्या बांधिलकीची साक्ष देते. त्यामुळेच आम्हाला लाखो वाचकांचे प्रेम आणि आदर मिळत आला आहे. घडणाºया घटनांच्या निष्पक्षतेने बातम्या देताना आणि त्यावर निर्भीड संपादकीय लिहिताना ‘लोकमत समूहा’ने नेहमीच पत्रकारितेची उच्च मूल्ये पाळली आहेत. बातमीदारी करताना आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड केलेली नाही व कोणाचीही भीडमुर्वत न बाळगता नेहमीच लोकहिताचा विचार केला आहे.
आम्ही असा पत्रकारितेचा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केल्यानेच ‘लोकमत’ला आज देशातील १० अग्रगण्य दैनिकांमध्ये स्थान आहे. ‘लोकमत’ हे महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून, त्याची दैनंदिन वाचकसंख्या २३.५ दशलक्षांहून अधिक आहे. (आधार : टोटल रीडरशिप, आयआरएस १२ क्यू ४). १७ आवृत्त्या, ५७ उप-आवृत्त्या आणि सुदूर पसरलेले बातमीदारांचे जाळे यामुळे ‘लोकमत’ ख-या अर्थाने महाराष्ट्र आणि गोव्याचा आवाज म्हणून ओळखले जाते.
आगळ्या शैलीचा ठसा असलेली पत्रकारिता व नावीन्याचा सातत्याचा ध्यास यामुळेच वाचकांच्या मनात आम्ही प्रेमाचे स्थान मिळवू शकलो आहोत. ‘लोकमत समूहा’तर्फे मराठीतील ‘लोकमत’, हिंदीतील ‘लोकमत समाचार’ आणि इंग्रजीतील ‘लोकमत टाइम्स’ ही तीन दैनिके प्रकाशित केली जातात व त्यांचा रोजचा खप २२ लाख प्रतींहून अधिक आहे.

केवलचंद सिंघवी आणि त्यांच्यासारख्या असंख्य वाचकांपुढे कृतज्ञतेने नतमस्तक होतानाच आम्ही त्यांच्या प्रेमाचा व निष्ठेचा विनम्रतेने स्वीकार करतो.
- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत समूह

Web Title: The name of 'Lokmat' is written by the reader. New version will soon be in Delhi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.