पेट्रोलियम मंत्रालयाच्या नावे लुटणारी टोळी राज्यात सक्रिय

By Admin | Published: June 15, 2017 01:26 AM2017-06-15T01:26:59+5:302017-06-15T01:26:59+5:30

सहा लाखांचा दंड टाळण्यासाठी मागितले ६० हजार

In the name of the Petroleum Ministry, the gang looted active in the state | पेट्रोलियम मंत्रालयाच्या नावे लुटणारी टोळी राज्यात सक्रिय

पेट्रोलियम मंत्रालयाच्या नावे लुटणारी टोळी राज्यात सक्रिय

googlenewsNext

संजय खांडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार आल्याची बतावणी करून दंडात्मक कारवाईचा धाक दाखवून राज्यातील पेट्रोल पंप संचालकांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. बुधवारी अकोल्यातील एका पेट्रोल पंप संचालकाला गळ घालून लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र या पेट्रोल पंप संचालकाने तक्रारीचा आशय विचारल्याने हा प्रयत्न तूर्त फसला आहे.
कौलखेड मार्गावरील भारत पेट्रोलियम पंपाचे संचालक प्रणय हिरोडकर यांना सकाळी १०.३० वाजता मोबाइलवर कॉल आला. पेट्रोलियम मंत्रालयातील सचिव गुजरसाहेब यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या लिस्टमध्ये हिंगोली, अमरावतीसह अकोल्यातील तुमच्या पेट्रोल पंपाचे नाव आहे. आम्ही गुजर साहेबांचे स्वीय सहायक असून, नुकताच हिंगोलीच्या पेट्रोल पंपावर कारवाई केली आहे. आम्ही आता अकोला-अमरावतीकडे येणार आहोत. अकोल्यातील पेट्रोल पंपावर आलो तर सहा लाख रुपये दंडाची कारवाई नाइलाजास्तव करावी लागेल. ही कारवाई टाळायची असेल तर दोन अधिकाऱ्यांचे प्रत्येकी तीस हजारांचे पॅकेज देऊन टाका. कारवाई होणार नाही आणि तक्रारींच्या लिस्टमधून तुमच्या पेट्रोल पंपाचे नाव वगळण्यात येईल, असे सांगितले गेले. हिरोडकर यांनी उपरोक्त संवादानंतर त्यांचे वडील आणि अकोल्यातील पेट्रोल पंप संचालकांना याबाबत अवगत केले. त्यानंतर या टोळीने पुन्हा हिरोडकर यांना मोबाइलवर संपर्क साधून तातडीने रक्कम हिंगोलीत पोहोचवा म्हणून दम दिला. हिंगोलीत कुणी हवाला घेत नसेल तर आदित्य भारत कोळी नामक व्यक्तीच्या दिलेल्या स्टेट बँकेच्या खात्यात रक्कम टाकण्याचे सांगितले. दरम्यान, हिरोडकर यांनी मंत्रालयापासून तर हिंगोलीच्या पेट्रोल पंपांपर्यंत संपूर्ण माहिती घेतली. त्यात कुठेच सत्यआढळूनआलेनाही. त्यामुळे हिरोडकर यांनी या टोळीला अकोल्यातील पेट्रोल पंपांवरच आपण तक्रारीचा निपटारा करू, असे सांगितले. त्यावर चिडून या टोळीने तुमच्या पेट्रोल पंपावर आता पाहा कशी कारवाई करतो म्हणून धमकी दिली. बुधवारी सकाळी १०.३० वाजतापासून तर सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत या टोळीने हिरोडकर यांना तब्बल २२ कॉल केल्याची माहितीही हिरोडकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

गेल्या अनेक महिन्यापासून पेट्रोलियम मंत्रालयातील सचिवांचे स्वीय सहायक बोलतो म्हणून राज्यातील अनेक पेट्रोल पंप संचालकांना लाखो रुपयांनी लुटणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीने आता अकोल्यातील पेट्रोल पंप संचालकांवरही प्रयोग सुरू केले आहे. मंत्रालयाची बतावणी करून कुणी धमक्या देत असेल तर त्यांनी असोसिएशन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. आमिषाला बळी पडू नये.
- राहुल राठी, पेट्रोलपंप असोसिएशन, जिल्हाध्यक्ष, अकोला.

Web Title: In the name of the Petroleum Ministry, the gang looted active in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.