रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी मास्टरमाईंडला अटक
By admin | Published: May 14, 2017 09:36 AM2017-05-14T09:36:23+5:302017-05-14T10:46:53+5:30
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी महेश सावंतचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणा-या मास्टरमाईंडला अटक
Next
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 14 - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी टायपिस्ट महेश सावंतचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणा-या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. मनोज मानवटकर असं त्याचं नाव आहे. वर्धा जिल्हातील पुलाई येथून त्याला अटक करण्यात आली आहे. मनोज मानवटकर यास काल रात्री सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीर्मलादेवी मँडम व अपर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन खरंगना ठाणेदार प्रशांत पांडे व कर्मचारी तसेच मलाबार हिल पोलिस स्टेशनचे पोलीस आणि त्यांच्या टीमने केली.आरोपी सध्या खरांगणा पोलीसांच्या ताब्यात असून न्यायालयाच्या परवानगीने त्याला मुंबई पोलीस ताब्यात घेतील. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडीसुध्दा जप्त करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे येथील गजानन खंदार या व्यक्तीने भीकूजी महाराज संस्थान परिसराचा रेती घाट लिलावात खरेदी केला होता. रेती घाट घेतल्यानंतर खन्डारला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयात टायपिस्ट म्हणून काम करणा-या महेश सावंत हा कार्यालयातून फोन करून दोन महिन्यांपासून पैसे मागत होता. 10 लाख रुपये द्यावे अन्यथा मंत्रालयामार्फत कारवाई करायला लावू अशी धमकी तो वाळू ठेकेदाराला देत होता. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन तो धमकी देत होता.
यापुर्वी याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणी सदर टायपिस्टला पोलिसांनी अटक केली आहे.