पुनर्विकासाच्या नावावर साडेतीन कोटींचा गंडा
By admin | Published: January 25, 2017 03:37 AM2017-01-25T03:37:24+5:302017-01-25T03:37:24+5:30
ठाण्यातील घणसोलीगतच्या तळवली भागातील चाळींचा पुनर्विकास करण्याचे आमीष दाखवून येथील ९० रहिवाशांना सुमारे साडेतीन
गुहागर : ठाण्यातील घणसोलीगतच्या तळवली भागातील चाळींचा पुनर्विकास करण्याचे आमीष दाखवून येथील ९० रहिवाशांना सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ठाणे येथील रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मूळचे गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील रहिवासी आणि गोल्डनमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र चव्हाण अलिबागमधील पिंंपळभाट येथे राहत होता. त्याने घणसोलीगतच्या तळवलीतील श्री स्वामी समर्थ चाळीतील रहिवाशांना चाळीच्या पुनर्विकासासंबधी चर्चा केली होती. त्यावेळी तेथील रहिवाशांना ते रहात असलेल्या चाळीचे अधिकृत रजिस्ट्रेशन करून सहा जागांवर नूतनीकरण करून इमारत बांधून देण्याचे आमीष दाखविले होते. (प्रतिनिधी)