पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव
By admin | Published: July 8, 2014 02:27 AM2014-07-08T02:27:41+5:302014-07-08T02:27:41+5:30
पुणे विद्यापीठाचा, ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली.
Next
मुंबई : स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांना साक्षरतेची कवाडे खुली करून देणा:या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुणे विद्यापीठाचा, ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली.
महात्मा जोतिबा फुले यांनी पुणो येथे 1848मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. स्वत: सावित्रीबाई फुले वयाच्या 17व्या वर्षी आद्य महिला शिक्षक बनल्या. त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून पुणो विद्यापीठास त्यांचे नाव देण्याची मागणी काही वर्षापासून होत होती. 26 ऑक्टोबर 2क्13 रोजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्येही ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार प्रस्ताव पुढे आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत नामविस्ताराचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मांडला. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता देऊन सावित्रीबाईंच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)