‘सोलापूर विद्यापीठाचाही नामविस्तार व्हावा’
By admin | Published: August 10, 2014 01:59 AM2014-08-10T01:59:13+5:302014-08-10T01:59:13+5:30
पुणो विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केल्यामुळे प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
Next
>पुणो : पुणो विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केल्यामुळे प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून, सोलापूरकरांनी विद्यापीठाकडे याबाबत आग्रह धरल्यास यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याना यासंदर्भातील पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
पुणो विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार सोहळा व विद्यापीठात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शरद पवार बोलत होते. राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, महापौर चंचला कोद्रे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विनायक निम्हण, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, बाबा आढाव आदी उपस्थित होते.