कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार करा, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 08:26 PM2019-12-07T20:26:12+5:302019-12-07T20:26:39+5:30

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे.

Name the University of Kolhapur change, Uddhav Thackeray's request to the Governor | कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार करा, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती

कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार करा, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे विनंती

Next

मुंबई : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच बदललेलं नाव कायदेशीर करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उदाहरणादाखल केवळ जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 

Web Title: Name the University of Kolhapur change, Uddhav Thackeray's request to the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.