दत्तू भोकनळने दिले पुरस्कारासाठी महिला कुस्ती मार्गदर्शकाचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:58 AM2018-11-28T05:58:38+5:302018-11-28T05:58:49+5:30
‘खऱ्या’ प्रशिक्षकाची क्रीडा आयुक्तांंकडे तक्रार; रोइंग असोसिएशन करणार चौकशी
- शिवाजी गोरे
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेतील रोइंग प्रकारातील सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळने शासनाच्या पुरस्कारासाठी महिला कुस्ती मार्गदर्शक अश्विनी बोºहाडे यांचे नाव दिले आहे. तब्बल १२ लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. दत्तूचे रोर्इंग मार्गदर्शक राजेंद्र शेळके यांनी क्रीडा आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे रोइंग असोसिएशनच्या सरचिटणीस मृदुला कुलकर्णी यांनी सांगितले.
इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी ५० लाख व त्याच्या मार्गदर्शकाला १२ लाख अशा पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाने केली होती. क्रीडा विभागाने मागविलेल्या अर्जामध्ये भोकनळ याने मार्गदर्शक म्हणून अश्विनी बोºहाडे यांचे नाव दिले. पुरस्कार सोहळ्यात धनादेशाच्या यादीत अश्विनी बोºहाडे यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. दत्तू पुण्यातील कॉलेज आॅफ मिलीटरी इंजिनीअरिंग (सीएमई) येथे सराव करतो. सीएमईमध्ये दत्तूचे मार्गदर्शक असलेल्या राजेंद्र शेळके यांनी याबाबत क्रीडा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. २०१५ मध्ये चीनमध्ये झालेल्या अशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने रौप्यपदक जिंकले होते. त्यावेळी त्याला ५ लाखांचा आणि मार्गदर्शक म्हणून शेळके यांना सव्वा लाखाचा पुरस्कार मिळाला होता.
मैदानावर उतरण्यापूर्वी खेळाडूची मानसिकता आणि तंदुरूस्ती हा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. भोकनळ यांना मी याबाबतचे मार्गदर्शन करीत आले आहे, असे कुस्ती मार्गदर्शिका अश्विनी बोºहाडे यांनी म्हटले आहे.
दत्तूने विश्वासघात करायला नको होता. तो एक साधारण सैनिक म्हणून बीईजीमध्ये भरती झाला होता. त्याची गुणवत्ता पाहून २०१३ मध्ये आर्मी रोइंग नॉड, सीएमईमध्ये सरावासाठी पाठविण्यात आले. तेथे मी वरिष्ठ मार्गदर्शक होतो. २०१६ मध्ये त्याची आॅलिम्पिक स्पर्धेसाठी शिबिरात निवड झाली. त्यावेळी मी सहायक मार्गदर्शक होतो, असा दावा रोर्इंग मार्गदर्शक सीएमई व भारतीय संघाचे सहायक मार्गदर्शक राजेंद्र शेळके यांनी केला आहे.
या प्रकाराची क्रीडा विभागाने शहानिशा तरी करायला हवी होती. खेळाच्या राज्य संघटनांचे अध्यक्ष किंवा सरचिटणीसांना विचारायला हवे होते. याबाबत राज्य संघटना चौकशी करणार आहे.
-मृदुला कुलकर्णी, सरचिटणीस, महाराष्ट्र रोइंग असोसिएशन.