रेल्वेवर झळकणार साहित्यिकांची नावे

By admin | Published: March 17, 2015 12:28 AM2015-03-17T00:28:37+5:302015-03-17T00:28:37+5:30

मुंबई आणि नाशिक येथून निघणाऱ्या रेल्वेच्या बोग्यांना साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागातध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

The names of authors to be seen on the railway | रेल्वेवर झळकणार साहित्यिकांची नावे

रेल्वेवर झळकणार साहित्यिकांची नावे

Next

पुणे : घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून निघणाऱ्या रेल्वेच्या बोग्यांना साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागातध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई आणि नाशिक येथून १ एप्रिल रोजी निघणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांच्या मिळून ३६ बोग्यांना मराठी साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. प्रवासी रसिकांना या साहित्यिकांच्या पुस्तकांचा आस्वाद घेता येणार आहे.
बोग्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ह. ना. आपटे, वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, प्र. के.अत्रे, आ. रा. देशपांडे (कवी अनिल), वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शंकरराव खरात, दया पवार, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, केशव मेश्राम, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे, इंदिरा संत, बहिणाबाई चौधरी, ग्रेस, शिवाजी सावंत, सुरेश भट, बाबूराव बागूल, बा. भ. बोरकर, विभावरी शिरूरकर, बाबा कदम, हमिद दलवाई आणि नामदेव ढसाळ यांची नावे देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

४८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच भाग्यवान साहित्यप्रेमींची नावे लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. याव्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यवान १०० जणांना १२ मराठी लोकप्रिय साहित्यावरील पुस्तकांचा संच देणार असल्याचेही देसडला यांनी सांगितले.
४प्रश्नमंजूषा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच बेळगाव, कर्नाटक, कारवार, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमधून आणि शहरांमधून स्पर्धकांनी पोस्टाने, ई-मेलवर तसेच एसएमएसच्या माध्यमातून उत्तरे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.
४प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजक सुधीर शिंदे म्हणाले, की मराठी
पुस्तकांचा वाचकवर्ग कमी होत असल्याची ओरड सुरू असताना वाचनसंस्कृतीला उत्तेजन मिळण्यासाठी या अभिनव
स्पर्धेचे आयोजन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच केले आहे.
४पहिल्या पाच भाग्यवंतांची नावे : सुशांत सकपाळ, डॉ. रोहित श्रीकांत आंबेकर (पुणे), नागनाथ देवीदास जावळे, योगेश महारू सूर्यवंशी (देवळा, नाशिक) आणि सुश्रूत लहू खळदकर (पुणे).

संमेलनाची तयारी प्रगतिपथावर
४साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमानकडे जाणारे अमृतसर, बियास आणि उमरतांडा येथील रस्त्यांच्या बांधणी आणि दुरुस्तींची कामे पूर्ण झाली असून, आता हे रस्ते वाहतुकीसाठी तयार झाले आहेत. संमेलनासाठी लागणाऱ्या मंडपाचे कामही आता सुरू झाले असून, त्यात प्रगती होत आहे. मधूनच पावसाचा व्यत्यय येत असला तरी पंजाब आणि स्थानिक प्रशासन मदतीला असल्याने सर्व कामे वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली जात आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले. याशिवाय संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी घुमानमधील नऊ शाळा व महाविद्यालये, गुरुद्वारा येथे निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. पंजाब पोलीस संमेलनाच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्थाही चोख करत आहेत.
५०० स्वयंसेवक
४घुमानमधील शाळा-महाविद्यालयांमधील मिळून ३०० व पुणे, सासवड, नाशिक येथील २०० असे एकंदर ५०० स्वयंसेवक संमेलनाच्या व्यवस्थेत सक्रिय सहभागी होत आहेत.

Web Title: The names of authors to be seen on the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.