भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांची नावे जानेवारीत होणार जाहीर - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:20 AM2018-12-26T06:20:39+5:302018-12-26T06:22:23+5:30
लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी येथील 'लोकमत भवन'ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते़ चार वर्षांपूर्वी झालेल्या सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यासंदर्भात विचारल्यानंतर पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजप चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवेल. विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील.
सर्व्हरच्या अडचणीमुळे सात बारा उताºयांवरील डिजीटल सिग्नेचरचे काम थांबले होते. सध्या अडीच कोटी सात बारा उताºयांपैकी चाळीस लाख उताºयांचे डिजीटल सिग्नेचरचे
काम पूर्ण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.