‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर
By admin | Published: July 28, 2016 01:02 AM2016-07-28T01:02:44+5:302016-07-28T01:02:44+5:30
वनविभागाच्या वतीने १ ते ३ जुलैदरम्यान राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यासाठी वनभवन येथे आयोजित
नागपूर : वनविभागाच्या वतीने १ ते ३ जुलैदरम्यान राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यासाठी वनभवन येथे आयोजित खास ‘ड्रॉ’मध्ये स्वत: प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनदल प्रमुख) यांच्या उपस्थितीत २५ विजेत्यांची निवड करण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे त्यापैकी २ नावे बाद करून, अन्य २३ जणांना विजेते ठरविण्यात आले आहे.
या विजेत्यांना २९ जुलै रोजी नागपुरात आयोजित जागतिक व्याघ्रदिन समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. वनविभागाच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यात १ जुलै रोजी राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसार, या दिवशी राज्यभरात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ झाडांची लागवड करण्यात आली. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हे आहेत विजेते
सुरेश पाऊल, देवनाश चौरसिया व नितीन रेवतकर (नागपूर) यांच्यासह मुकेश माकडे (मुंबई), ऋषिकेश बावणे (अमरावती), प्रकाश पाटील संदीप पटोले, संजय मिथारी व सुनील पवार (कोल्हापूर), रामजी गगरानी (हिंगोली), दीपाली पाटील (धुळे), मनीष मंत्री (वाशिम), पारस शहाणे (पालघर), डॉ. स्वाती राऊत (सोलापूर), आशिष निरुडे व नामदेव भोये (लातूर), विराट दुसाने
(नाशिक ), राजीव गोधेराव, गजानन जकाते, राजेंद्र पाटील, विपेश देधिया (मुंबई), नारायण पालोडकर (पुणे) यांचा समावेश आहे.