नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:51 PM2019-11-27T12:51:38+5:302019-11-27T13:08:27+5:30
नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट चुकली असली तरी सत्तार उशीरा का होईऩ 'राईट ट्रॅक'वर दिसत आहेत.
मुंबई -लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही भाजप सहज बाजी मारणार असं चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे पाच वर्षे सत्तेत बसलेल्या आमदारांना पुन्हा एकदा सत्तेत जाण्याचे वेध लागले होते. त्या अनुषंगाने अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यापैकी अनेक नेते पराभूत झाले असून विजयी झालेले नेते आता विरोधात बसणार आहेत. मात्र शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचं साधणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नमिता मुंदडा, सुरेश धस, राणा जगजितसिंह, गणेश नाईक तर काँग्रेसमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे भाजपमध्ये गेले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे.
भाजपमध्ये दाखल झालेल्या नमिता मुंदडा यांच्यासह राणा जगजितसिंह, गणेश नाईक विजयी झाले आहेत. परंतु, भाजप पक्ष विरोधात बसल्यामुळे या नेत्यांना पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार आहे. त्यातच भाजपने मुळ नेत्यांना प्रधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नेत्यांची चांगलीच गोची होणार आहे.
या नेत्यांव्यतिरिक्त काँग्रेसचे विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि नारायण राणे यांना पक्षात मोठा मान होता. विखे पाटील विरोधीपक्षनेते होते. या नेत्यांना आता मंत्रीपदाची संधी मिळाली असती. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय या नेत्यांचा चुकला आहे. राणे आता राज्यसभेवर खासदार असून विखे यांना विरोधीपक्ष नेतेपदही मिळण्याची शक्यता नाही.
दरम्यान भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्याने शिवसेनेत जावून आमदारा झालेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसनेते अब्दुल सत्तार यांच चांगलच साधलं. शिवसेना सत्तेत असून खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. याचा लाभ सत्तार यांना होणार असून मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
एकूणच नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट चुकली असली तरी सत्तार उशीरा का होईऩ 'राईट ट्रॅक'वर दिसत आहेत.