संगिता ठोंबरेंच्या स्ट्राँग फिल्डींगमुळे नमिता मुंदडा आहे तिथेच ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:47 PM2019-09-25T12:47:39+5:302019-09-25T12:53:45+5:30
एकूणच भाजपमध्ये जाऊन देखील उमेदवारीची आशा धुसर असल्याने नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश रद्द झाला असून त्या आहे तिथेच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई -विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना बीडचे राजकारण पुन्हा एकदा पक्षांतराने ढवळून निघणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर आहे. परंतु केज मतदार संघातून विद्यामान आमदार संगिता ठोंबरे यांनी उमेदवारीसाठी स्ट्राँग फिल्डींगमुळे लावल्यामुळे नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश बारगळला असल्याची चर्चा बीडमध्ये सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी बीडमधील पाच मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, विजयराजे पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांचा समावेश होता. मात्र पवारांचा मराठवाडा दौरा पूर्ण होताच, नमिता मुंदडा देखील भाजपच्या वाटेवर असल्याची केज मतदार संघात चर्चा सुरू झाली होती. या मतदार संघातून संगिता ठोंबरे विद्यमान आमदार आहेत.
नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पेजवरील फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख नव्हता. तसेच घड्याळाचे चिन्ह देखील नव्हते. त्यामुळे त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या स्थितीत संगिता ठोंबरे यांची उमेदवारी डळमळीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, ठोंबरे यांनी आपली ताकद पणाला लावत उमेदवारी कायम राखल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नमिता मुंदडा यांना भाजपमध्ये जावून फारसा लाभ होणार नाही, अशी स्थिती आहे.
एकूणच भाजपमध्ये जाऊन देखील उमेदवारीची आशा धुसर असल्याने नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश रद्द झाला असून त्या आहे तिथेच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.