“भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:11 PM2023-05-24T18:11:52+5:302023-05-24T18:14:40+5:30

Nana Patole: कर्नाटकच्या जनतेने भाजपचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही, असे सांगत टीका करण्यात आली आहे.

nana patole criticized bjp about social unity of the country | “भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

“भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

googlenewsNext

Nana Patole: भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकारिणीची बैठक पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 

कर्नाटकच्या जनतेने भाजपचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही

देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून भाजप सरकार काम करत आहे. जाती धर्माच्या नावावर भाजप राजकारण करत आहे पण देशातील जनतेला भाजपाचा हा ढोंगी चेहरा समजला आहे. कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत भाजपाने हिजाबसारखे विविध धार्मिक मुद्दे उकरून काढले. पण ज्या नेत्यांनी धार्मिक मुद्द्यांवर भर दिला त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. कर्नाटकच्या जनतेने भाजपाचे धर्मांध राजकारण चालू दिले नाही. डबल इंजनच्या सरकारवर भाजपा भर देत होते पण मणिपूरमध्ये डबल इंजिनचेच सरकार आहे, तिथे आज काय परिस्थिती आहे हे आपण पहातच आहोत. मणिपूर जळत आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिकडे पाहण्यासही वेळ नाही.

दरम्यान, कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीने देशात डबल इंजिनची गरज नाही हे दाखवून दिले. डबल इंजिनची गरज तेव्हाच पडते जेव्हा एक इंजिन बंद पडते परंतु काँग्रेसकडे एकच भक्कम व ताकदवान इंजिन आहे आणि ते म्हणजे राहुल गांधी. देशाचे पंतप्रधान कर्नाटकच्या गल्ली-बोळात फिरले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो. एमआयएम व बीआरएस हे दोन पक्ष महाराष्ट्रात मतविभाजनाचे काम करतात व त्याचा थेट फायदा भाजपाला होतो. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाटी अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने काँग्रेसच्या मागे उभे रहावे, असे अवाहन चव्हाण यांनी केले.   

 

Web Title: nana patole criticized bjp about social unity of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.