नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द, राज्य सरकारची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 06:02 PM2019-03-02T18:02:13+5:302019-03-02T20:05:50+5:30

स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे.

Nanar refinery project finally canceled, announced by the state government | नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द, राज्य सरकारची घोषणा 

नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द, राज्य सरकारची घोषणा 

googlenewsNext

मुंबई - स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. 

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत माहिती देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की,''स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेली शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत देेण्यात येईल. तसेच जमिनींच्या सातबारावर असलेला एमआयडीची शिक्काही हटवण्यात येईल. त्याबरोबरच आता ज्या भागात या प्रकल्पासाठी स्थानिक जनता अनुकूल असेल, अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येईल.'' 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत युतीचा निर्णय घेण्यापूर्वी नाणार प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली  होती. तसेच शिवसेनेही वेळोवेळी नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.  तसेच नाणार परिसरातील रहिवासी, मुंबईकर मंडळी आणि कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. 

Web Title: Nanar refinery project finally canceled, announced by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.