पाणी आणण्यासाठी गेलेल्या नणंद- भावजयीचा बुडून दुर्दैवी मृत्यू
By Admin | Published: June 8, 2017 05:49 PM2017-06-08T17:49:46+5:302017-06-08T17:50:01+5:30
तालुक्यातील सोनसावंगी शिवारात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू
>लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव(हिंगोली), दि. 8 - तालुक्यातील सोनसावंगी शिवारात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली असून मयत महिला नंणद- भावजय असून नांदेड जिल्ह्यातील धावरी या गावच्या आहेत.
तालुक्यातील खडकी ते सोनसावंगी या रस्त्याचे काम चालू असून सदर रस्त्याच्या कामाकरीता भोकर तालुक्यातील धावरी या गावातील कामगार कामावर आले आहेत. गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास ज्योती तिमन्ना राऊत (२०), लक्ष्मी हनुमंता राऊत (१७) या कामगार नंणद- भावजय महिला सोनसावंगी शिवारातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एकीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने दुसरी महिला तिला वाचविण्यासाठी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यासाठी गेलेल्या महिला बराच वेळ झाला तरीही वापस आल्या नसल्याने शोध घेतला असता विहिरीच्या काठावर पाण्याचे भांडे दिसले परंतु महिला सापडल्या नाहीत. त्यानंतर विहिरीच्या पाण्यात शोध घेतला असता दोन्ही महिलांचे मृतावस्थेत प्रेत सापडले. ही घटना कळल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कारेगावकर, पोलिस कर्मचारी शेषराव राठोड, खंडेराव नरोटे, शिवशंकर गायकवाड, इम्रान पठाण आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात आकस्मीत मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.