नांदेड, अहमदनगर 9.5, मुंबई 18 अंशांवर
By admin | Published: December 7, 2014 01:36 AM2014-12-07T01:36:22+5:302014-12-07T01:36:22+5:30
उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग कायम राहिल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.
Next
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग कायम राहिल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. शनिवारी मराठवाडय़ातील नांदेड आणि अहमदनगर या दोन्ही शहरांचे किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमानदेखील पुन्हा एकदा 18 अंशांवर खाली घसरले आहे.
नोव्हेंबर महिन्यात सर्वसाधारणत: राज्यासह मुंबईच्या तापमानात घसरण नोंदविण्यात येते. परंतु हवामानातील बदलामुळे आता थंडीचा जोर उशिराने वाढू लागला असून, या वर्षी नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. हवामानातील बदल आणि हिमवादळांमुळे थंडीची सुरुवात विलंबाने होते आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हिमवादळे हिमालयाकडून चीनकडे येतात तेव्हा थंडीचा जोर आणखी वाढतो. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. (प्रतिनिधी)